कोल्हापूर : उत्तरेचे विधानसभेचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनाने कोल्हापूर उत्तरेत पोटनिवडणूक होऊ घातली आहे. भाजपकडून सत्यजित कदम हे मैदानात उतरले आहेत तर पालकमंत्री बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसकडून जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. इतरही काही पक्षांनी कोल्हापूर उत्तरेत आता आपली ताकद आजमावण्यास सुरुवात केली आहे.
मुंबै बॅंक निवडणुक प्रकरण: प्रवीण दरेकरांवर अटकेची टांगती तलवार
महाविकास आघाडी आणि भाजप दोन्हींकडून आता प्रचारास सुरुवात करण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, माजी आमदार राजेश क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हे प्रचारात उतरले आहेत. दुसरीकडे भाजपकडून आता वेगळ्या पद्धतीने प्रचार करण्यास सुरुवात झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर उत्तरेत सत्यजित कदम प्रचार करत आहेत. यासोबतच त्यांना माजी खासदार धनंजय महाडिक, महादेवराव महाडिक, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, अशोक देसाई, सुहास आण्णा लटोरे, सुदर्शन पाटील, प्रताप देसाई, किरण नकाते हे देखील प्रचारात आघाडीवर आहेत.
दापोलीत किरीट सोमय्यांना पोलीस ताब्यात घेणार; शंभुराज देसाई यांनी दिला इशारा
आज सकाळपासूनच ‘चाय पे चर्चा’ या आगळ्या वेगळ्या प्रचार संकल्पनेला भाजपकडून सुरुवात करण्यात आली आहे. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत ज्या पद्धतीने प्रचार करण्यात आला आणि भाजपला विजय मिळवता आला त्याच धर्तीवर कोल्हापुरात विजय मिळविण्याचे मनसुबे आता भाजपकडून समोर आले आहेत.
दापोलीत किरीट सोमय्यांना पोलीस ताब्यात घेणार; शंभुराज देसाई यांनी दिला इशारा
आज सकाळीच भाजपने कोल्हापूर उत्तरेत मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांशी बसून चाय पे चर्चा केली आहे. चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक, सत्यजित कदम यांनी यावेळी भाजपचा उमेदवार निवडून आल्यानंतर केल्या जाणाऱ्या विकासकामांबद्दल नागिरकांना माहिती दिली. भाजपच्या या नवीन संकल्पनेस नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. यामुळे निश्चित सत्यजित कदम यांच्या मतदानात फरक पडेल असंही बोललं जातं आहे.
Read also:
- ‘मातोश्री’ला वाचवण्यासाठी स्वत: च्या आईचे नाव द्यावे, वाईट वाटते; भाजप नेत्याची टीका
- आपण किती खरं बोलतो ते देवाच्या दरबारात तपासून घेतलं पाहिजे :संजय राऊत
- प्रमोद सावंतांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ; मोदींसह अमित शहा, फडणवीस सोहळ्याला उपस्थित
- मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला मारहाण; शिवसैनिकांवर गृहमंत्री कारवाई करणार का?
- बीडमध्ये काका-पुतण्या संघर्ष पेटला; क्षीरसागरांनी फोडले राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच नेते