बीड : बीडमध्ये काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष आता चांगलाच जोर धरू लागला आहे. काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर विरुद्ध पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यातील दारी आता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. मागच्या आठवड्यात खासदार ओमराजे निंबाळकर आणि जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसंपर्क अभियानांतर्गत जोरदार भाषणे करून बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर हल्ला चढवला होता.
आमदारांच्या जाचामुळे आम्हाला शिवसेनेत जावं लागलं; क्षीरसागरांचे राष्ट्रवादीवर धक्कादायक आरोप
शिवसंपर्क अभियान हे वादग्रस्त ठरणार असंच काहीसं चित्र गेल्या काही दिवसांमध्ये तयार झालं आहे. बीडमध्ये याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं पहिला गियर टाकत ‘आम्ही आता ऐकणार नाही’ असं नकळत राष्ट्रवादीला सुचवलं आहे. शिवसेनेनं बीडमध्ये शिवसंपर्क अभियानाअंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सडकून टीका केली तर केलंच पण चार नेते फोडून आता आमदारकीही आमची असा इशारा दिला आहे.
अखेर मलिक बिनखात्याचे मंत्री ; राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांकडे त्यांचा कारभार सोपवला
याचे मुख्य सूत्रधार ठरले आहेत काल प्रवेश झालेले राष्ट्रवादीचे ५ नेते. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गंगाधर घुमरे, पालिकेचे माजी गटनेते फारुक पटेल, माजी नगरसेवक अमर नाईकवाडे, प्रेमचंद लोढा व भिमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष नितीन लोढा यांनी काल संध्यकाळी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आणि संदीप क्षीरसागरांच्या बेगडी कारभावर टीका केली. आमदार संदीप क्षीरसागर हे कायमचं झिंग होऊन काम करतात अशी त्यांची ‘झिंग स्टाईल’ आहे. निवडणुकीत मागच्या वेळी जरी चूक झाली असेल तरी यावेळी मात्र अशी चूक होणार अशी ग्वाही पाचही नेत्यांनी जयदत्त अण्णा क्षीरसागरांना दिली आहे.
“शरद पवार अन् रामराजे यांच्या पुढे हरलो नाही, माझा आंडू पांडूनी नाद करू नये”
तहसील कार्यालय असो की बांधकाम खाते प्रत्येक ठिकाणी टक्केवारी साठी लोकं ठेवल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केले. त्यांचे ब्लॅकचे धंदे चालतात ते सुसाट आहेत. वाळू असो की रेशन सगळीकडे आजी – माजी आमदार पार्टनर आहेत. प्लॉटिंग करणाऱ्यांना सुद्धा त्रास दिला जातोय अशी बीडची राजकीय परिस्थिती आहे. त्यामुळे आता शिवसेनेला पुन्हा एकदा साथ द्या असं जयदत्त अण्णा क्षीरसागरांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.
Read also:
- आमदारांना 300 घर बांधणार असल्याच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले..;
- महाराष्ट्राला वेठीस धरू नका; एक पाऊल तुम्ही पुढं या एक पाऊल आम्ही येतो: ऊर्जामंत्री नितीन राऊत
- आम्ही आदेशाची वाट पाहतोय; तानाजी सावतांचा राष्ट्रवादी, काॅंग्रेसला इशारा
- मग का प्रकरणाला उकळी देण्याचं काम करता? अजित पवार जाधव प्रकरणावरून भडकले
- आमच्या मांडीला मांडी लावून बसले अन् आमची घडी..; सेनेच्या नेत्याचा काॅंग्रेस, राष्ट्रवादीवर निशाणा