मुंबई : महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना नेत यंशवंत जाधव यांच्या घरी अलिकडेच इडीने छापा टाकला. त्यांच्याकडून काही मालमत्ता इडीने जप्त केल्या आहेत. अशातच आता त्यांच्या डायरीत मातोश्री ला दोन कोटी रूपये आणि 50 लाख रूपयांचे घड्याळ दिल्याचं तपासाअंती इडीच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागलं. याच दरम्यान हा उल्लेख आपल्या आईबाबतचा असल्याचा खुलासा यशंवत जाधव यांनी इडीकडे केला आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
” तुमच्या नाकर्तेपणाचा कारभार आयुक्तांवर थोपवू नका “; राष्ट्रवादीचा गिरीश बापटांवर हल्लाबोल
ते म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणा त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत. अशा प्रकारे चौकशा या होतच राहतात. यशवंत जाधव यांनीच याबाबत उत्तर दिलं आहे. मी माझ्या आईला मातोश्री म्हणतो, असं त्यांनीच म्हटलं आहे. त्यामुळे काही लोक आपल्या आईला मातोश्री म्हणतात. बरोबर आहे की नाही ? ते स्वत: म्हणतात त्याला पुन्हा पुन्हा का अधिक उकळी देण्याचं काम करत आहेत. असाही टोला अजित पवारांनी या प्रकरणावरून टिप्पणी करणाऱ्यांवर लगावला.
पंतप्रधानांनीच चित्रपट बघण्याचं आव्हान केलं तर एकवाक्यता टिकणार कशी ? शरद पवार
यशंवत जाधव यांनी मातोश्री ला दोन कोटी रूपये आणि 50 लाख रूपयांचे घड्याळ दिल्याच्या चर्चा राज्यात जोर धरू लागल्या. यावरून हद्द कर दी.. यशवंत जाधवांनी घोटाळ्या लपवण्यासाठी, वांद्रा मातोश्रीला वाचवण्यासाठी स्वत: च्या आईचे नाव द्यावे.. वाईट वाटते. 50 लाखाचे घड्याळ, 2 कोटी रोख, जाधवांनी पोचपाती, बिलही घेतले असेल, असं ट्विट किरीट सोमय्यांनी केलं आहे.
निवडणुकसाठी भाजपचा नवा डाव; भाजप करणार ‘चाय पे चर्चा’
या प्रकरणाबाबत भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. या डायरीच्या तपासअंती सगळं प्रकरण बाहेर यावं. त्यासाठी इडीने मातोश्रीची चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटिल आणि अतुल भातखळकर यांनी केली आहे.
Read also:
- आमच्या मांडीला मांडी लावून बसले अन् आमची घडी..; सेनेच्या नेत्याचा काॅंग्रेस, राष्ट्रवादीवर निशाणा
- आमदारांच्या जाचामुळे आम्हाला शिवसेनेत जावं लागलं; क्षीरसागरांचे राष्ट्रवादीवर धक्कादायक आरोप
- अखेर मलिक बिनखात्याचे मंत्री ; राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांकडे त्यांचा कारभार सोपवला
- “शरद पवार अन् रामराजे यांच्या पुढे हरलो नाही, माझा आंडू पांडूनी नाद करू नये”
- राज्य सरकारवर टीका करत पंकजा मुंडेंचा भाजपलाही घरचा आहेर; म्हणाल्या..;