मुंबई : राज्यात निधी वाटपावरून जोरदार राजकारण सुरू आहे. यावरून महाविकास आघाडीतील काही नेते नाराज असल्याचं चित्र होतं. अशातच आता शिवसेेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी देखील निधी वाटपावरून नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेसची जाहीर कार्यक्रमातून कानउघडणी करत जोरदार निशाणा साधला.
पंतप्रधानांनीच चित्रपट बघण्याचं आव्हान केलं तर एकवाक्यता टिकणार कशी ? शरद पवार
ते म्हणाले की, आमच्यामुळे हे सत्तेत आले. आमच्या मांडीला मांडी लावून बसले आणि आमची घडी विस्कटायचा तुम्ही प्रयत्न करतात हे आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही फक्त आदेशाची वाट पाहतोय, असा इशारा देखील तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेसला दिला आहे. त्यामुळे यावर आता राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेस काय प्रतिक्रिया देतात ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
निवडणुकसाठी भाजपचा नवा डाव; भाजप करणार ‘चाय पे चर्चा’
2019 पासून आजपर्यंत या तानाजी सावंतने पक्षाच्या विरोधात एक भूमिका घेतली किंवा पक्षाच्या विरोधात एक विधान केलंलं दाखवावं, मी आता आमदारकीचा राजीनामा देतो. विविध पक्षाच्या माध्यमातून आपल्या पक्षातील लोकांना धरून ज्या पद्धतीने दोन वर्ष कांड रंगवलं गेलं. ते कुठेतरी आज कार्यक्रमामध्ये आणि मी मागेही एकदा पुण्यात बोललो होतो. की तुम्ही आमचं का वाकून बघताहेत. तुम्ही तुमचं बघा काय सुरू आहे. असंही ते म्हणालेत.
‘मातोश्री’ला वाचवण्यासाठी स्वत: च्या आईचे नाव द्यावे, वाईट वाटते; भाजप नेत्याची टीका
दरम्यान, आमचं याठिकाणी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी श्रद्धा आहे. आमच्याकडे आदेश चालतो आणि त्या आदेशाची वाट आमदार,खासदार, मंत्री किंवा शिवसैनिक असो प्रत्येकजण आम्ही आतुरतेने बघतो. आम्ही त्या आदेशानुसार चालतो. आम्हाला सत्तेत बसायची सवयच नव्हती. विषयच नाही, कडवा शिवसैनिक ज्याच्या मनगटाच्या ताकदीवरती. त्याने कधी ऊन, वारा, पाऊस, किंवा काही साम, दाम, मिळते की नाही याचा विचार केला नाही, असंही ते म्हणाले.
Read also:
- आमदारांच्या जाचामुळे आम्हाला शिवसेनेत जावं लागलं; क्षीरसागरांचे राष्ट्रवादीवर धक्कादायक आरोप
- अखेर मलिक बिनखात्याचे मंत्री ; राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांकडे त्यांचा कारभार सोपवला
- “शरद पवार अन् रामराजे यांच्या पुढे हरलो नाही, माझा आंडू पांडूनी नाद करू नये”
- राज्य सरकारवर टीका करत पंकजा मुंडेंचा भाजपलाही घरचा आहेर; म्हणाल्या..;
- ” तुमच्या नाकर्तेपणाचा कारभार आयुक्तांवर थोपवू नका “; राष्ट्रवादीचा गिरीश बापटांवर हल्लाबोल