मुंबई : मुंबईचा एवढा गांभीर्यानं विचार माझ्या मंत्रीमंडळातील मंत्र्याएवढा कुणी केला नव्हता. त्याचा उल्लेख थेट सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून केला गेला. राज्यात काही योजना करायच्या आहेत परंतु आपल्या हातात नाही. तसेच महाविकास आघाडी फक्त घोषणा देत नाही तर काम करून दाखवत आहे. आम्ही दिलेला शब्द पाळतो, तसंच मुंबईत आमदारांना घरं देणार असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केलं होतं. आता याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अखेर मलिक बिनखात्याचे मंत्री ; राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांकडे त्यांचा कारभार सोपवला
मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याबाबत शरद पवार म्हणाले की, केवळ आमदारांसाठी गृहनिर्माण योजना नको. गृहनिर्माण योजनेतील घरांमध्ये आमदारांसाठी कोटा ठेवावा, हे योग्य आहे. मात्र त्या आमदारांना घर देताना त्याची योग्य ती किंमत घेतली पाहिजे. इतकंच नाही तर शरद पवार राज्य सरकारच्या या निर्णयाबाबत पक्षातील मंत्र्यांशी चर्चाही करणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं.
“शरद पवार अन् रामराजे यांच्या पुढे हरलो नाही, माझा आंडू पांडूनी नाद करू नये”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत आमदारांना घर देण्याची घोषणा करताच त्यावरून तिखट प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलं. त्यांनी त्याबाबत एक ट्विट केलं. त्यात त्यांनी आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतोय. मी स्पष्ट करू इच्छितो की,सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत+बांधकाम खर्च (अपेक्षित खर्च 70 लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे. असं म्हटलं होतं.
राज्य सरकारवर टीका करत पंकजा मुंडेंचा भाजपलाही घरचा आहेर; म्हणाल्या..;
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की राज्य सरकारकडून देण्यात येणारं कोणतंही घरं भाजप घेणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर यावरून राज्यात राजकीय वातावरण थोडसं चिघळल्याचं दिसून आलं.
Read also:
- महाराष्ट्राला वेठीस धरू नका; एक पाऊल तुम्ही पुढं या एक पाऊल आम्ही येतो: ऊर्जामंत्री नितीन राऊत
- आम्ही आदेशाची वाट पाहतोय; तानाजी सावतांचा राष्ट्रवादी, काॅंग्रेसला इशारा
- मग का प्रकरणाला उकळी देण्याचं काम करता? अजित पवार जाधव प्रकरणावरून भडकले
- आमच्या मांडीला मांडी लावून बसले अन् आमची घडी..; सेनेच्या नेत्याचा काॅंग्रेस, राष्ट्रवादीवर निशाणा
- आमदारांच्या जाचामुळे आम्हाला शिवसेनेत जावं लागलं; क्षीरसागरांचे राष्ट्रवादीवर धक्कादायक आरोप