अलिबाग : शिवसेनेचे माजी खासदार आणि शिवसेनेचे नेते अनंत गीते हे मागील काही दिवसांपासून शिवसेना नेतृत्वावर नाराज असल्याचे बोलले जात होते. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या जाहीर मेळाव्यांमध्ये त्यांनी महाविकास आघाडी सरकारबद्दल उघड नाराजी व्यक्त केली होती. शरद पवार हे आमचे नेते कधीही होऊ शकत नाही, असं वक्तव्य देखील त्यांनी जाहीरपणे केलं होतं.
आमदारांना 300 घर बांधणार असल्याच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले..;
त्यानंतर थेट मातोश्रीवरून त्यांना आदेश देऊन शांत करण्याचे प्रयत्नही झाले होते. त्यांनी मात्र नंतरही समजुतीची भूमिका न घेतल्याने शिवसेनेने त्यांना रायडगमधून संघटनेतून बाजूला केल्याचे चित्र आता समोर आले आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे आता रायगडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ३० मार्च म्हणजे उद्या हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नाराजी ओढवून घेतल्यामुळे मिठातून जसा खडा बाजूला करण्यात येतो, त्याच पद्धतीने गितेंना बाजूला सारण्यात आले आहे. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून अनंत गीते यांना वगळण्यात आले आहे.
महाराष्ट्राला वेठीस धरू नका; एक पाऊल तुम्ही पुढं या एक पाऊल आम्ही येतो: ऊर्जामंत्री नितीन राऊत
अनंत गीते यांनी रायगडचे दोन वेळा आणि रत्नागिरी जिल्ह्याचे चार वेळा खासदार म्हणून नेतृत्व केलेलं आहे. भाजप-शिवसेना युती काळात केंद्रीय अवजड-उद्योग मंत्री म्हणूनही त्यांनी कार्यकाळ सांभाळला होता. तरीदेखील राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केल्याने आता अनंत गितेंना आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यातून बाजूला काढण्यात आले आहे.
आम्ही आदेशाची वाट पाहतोय; तानाजी सावतांचा राष्ट्रवादी, काॅंग्रेसला इशारा
आदित्य यांच्या स्वागतासाठी जिल्ह्यात लागलेल्या बॅनरवर उद्योग मंत्री सुभाष देसाई, तंत्रशिक्षण मंत्री उदय सावंत, उपनेते विनोद घोसाळकर यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेना आमदार, पदाधिकारी यांचे फोटो झळकत आहेत मात्र सहा वेळा खासदार राहिलेल्या गीते यांना कटाक्षाने बॅनरमध्ये स्थान देण्यास टाळल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहेत. हे सर्व वरिष्ठांच्या आदेशानुसार होत आहे असं देखील पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
Read also:
- ज्यांना कमी मिळालं त्यांची नाराजी दुर केली जाईल; सावंताच्या नाराजीवर आदित्य ठाकरेंचा सुर
- पवारांनी आयुष्यभर फक्त काड्या लावायचं काम केलं, त्यांचा आडनाव आगलावे करा: सदाभाऊ खोत
- सकाळची सत्ता गेल्यानंतर त्यांचा तडफडेचा ‘हा’ आवाज! नाना पटोलेंची भाजपवर जहरी टिका
- कोल्हापूर उत्तरेत भाजपची प्रचार आघाडी; वाघाची तालीम सदस्यांचा भाजपला पाठींबा जाहीर
- आमदार संदीप क्षीरसागरांची ‘झिंग कार्यपद्धती’ निष्क्रिय; क्षीरसागरांवर शिवसेनेची बोचरी टीका