सोलापूर : राज्यात निधी वाटपावरून जोरदार राजकारण सुरू आहे. यावरून महाविकास आघाडीतील काही नेते नाराज असल्याचं चित्र होतं. अशातच आता शिवसेेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी देखील निधी वाटपावरून नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेसची जाहीर कार्यक्रमातून कानउघडणी करत जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, 2019 पासून आजपर्यंत या तानाजी सावंतने पक्षाच्या विरोधात एक भूमिका घेतली किंवा पक्षाच्या विरोधात एक विधान केलंलं दाखवावं, मी आता आमदारकीचा राजीनामा देतो. विविध पक्षाच्या माध्यमातून आपल्या पक्षातील लोकांना धरून ज्या पद्धतीने दोन वर्ष कांड रंगवलं गेलं. ते कुठेतरी आज कार्यक्रमामध्ये आणि मी मागेही एकदा पुण्यात बोललो होतो. की तुम्ही आमचं का वाकून बघताहेत. तुम्ही तुमचं बघा काय सुरू आहे.
आमदार संदीप क्षीरसागरांची ‘झिंग कार्यपद्धती’ निष्क्रिय; क्षीरसागरांवर शिवसेनेची बोचरी टीका
आम्ही फक्त आदेशाची वाट पाहतोय
विरोधी पक्षांनी जे बोंबालयचं ते बोंबलु द्या. तथ्य काय आहे. ते समजा. 57 ते 60 टक्के निधी राष्ट्रवादीला, 35 टक्के काॅंग्रेसला आणि शिवसेना 16 टक्के निधी दिलं जातं. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आमचं असल्यानं पगारांवर त्याठिकाणी 6 टक्के जातंय. विकासाचं काय? त्यासाठी फक्त 10 टक्के आहे. विविध शहरांतील जिल्हा प्रमुखांचे मला फोन येतात. त्याठिकाणाचा ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांच्याकडे जाऊन 1 ते 2 कोटींची कामे मंजूर करून येतो आणि ते आपल्या छातावर बसतात. ते आमदार आणि खासदरांना मिळत नाही. आमच्यामुळे हे सत्तेत आले. आमच्या मांडीला मांडी लावून बसले आणि आमची घडी विस्कटायचा तुम्ही प्रयत्न करतात हे आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही फक्त आदेशाची वाट पाहतोय, असा इशारा देखील तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेसला दिला आहे. त्यामुळे यावर आता राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेस काय प्रतिक्रिया देतात ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
आमदारांना 300 घर बांधणार असल्याच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले..;
खेड पंचायत समितीत राष्ट्रवादीने सभापतीला आमिष दाखवत, मारहाण करत पक्षात घेतलं
बुलढाण्याची विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार दिला होता. त्याठिकाणी अनिल देशमुखांचा भाचा होता. या पक्षांनी अपक्ष उमेदवार निवडून आणला आणि सेनेचा उमेदवार पाडला. तो देखील अपयश पचवला. त्यानंतर पुण्यातील जिल्ह्यातील खेड पंचायत समितीत सभापतीला आमिष दाखवलं, मारहाण केली आणि राष्ट्रवादीत घेतला. नगरचे नगरसेवक राष्ट्रवादीत घेतले मात्र शिवसेनेने आवाज उठवला ते परत शिवसेनेत घेतले. ज्या पक्षांनी तुम्हाला सत्तेत बसवलं. त्यांच्यावर तुम्ही अन्याय करायचं. आम्ही का सहन करायचं.
महाराष्ट्राला वेठीस धरू नका; एक पाऊल तुम्ही पुढं या एक पाऊल आम्ही येतो: ऊर्जामंत्री नितीन राऊत
तुम्ही 100 मारले आणि आमचा एकच दणकट बसला तर आईचं दुध आठवेल
ज्यांनी तुम्हाला सत्ता अनुभवायला दिली. तुम्ही त्यांच्यावरच अन्याय करता. एकमेकांचे कार्यकर्ते फोडू नये असं ठरलेलं असताना असं का होतं? आमच्या नादी लागू नका, तुम्ही 100 मारले आणि आमचा एकच दणकट बसला तर आईचं दुध आठवले असा इशारा देखील त्यांनी दिला. 2019 पासून आजपर्यंत या तानाजी सावंतने पक्षाच्या विरोधात एक भूमिका घेतली किंवा पक्षाच्या विरोधात एक विधान केलंलं दाखवावं, मी आता आमदारकीचा राजीनामा देतो. विविध पक्षाच्या माध्यमातून आपल्या पक्षातील लोकांना धरून ज्या पद्धतीने दोन वर्ष कांड रंगवलं गेलं. ते कुठेतरी आज कार्यक्रमामध्ये आणि मी मागेही एकदा पुण्यात बोललो होतो. की तुम्ही आमचं का वाकून बघताहेत. तुम्ही तुमचं बघा काय सुरू आहे. असंही ते म्हणालेत. उस्मानाबाद डीसीसी बॅंक निवडणुकीत सगळ्यांनी ठरवलं की महाविकास आघाडीतून पाच पाच जागा लढायचं ठरलं. मी अट घातल्याप्रमाणे त्या बॅंकेचा चेअरमन पद हा शिवसेनेचा असणार असा मुख्यमंत्र्यांनी त्यांनी शब्द दिला. त्यानंतर पंधरा ते पंधरा उमेदवारांना आम्ही निवडून आणलं. त्यानंतर त्यादिवशी एक वाजता राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस एकत्र आले आणि त्यात त्यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडला. तर शिवसेनेला काहीही विचारलं नाही.
आम्ही आदेशाची वाट पाहतोय; तानाजी सावतांचा राष्ट्रवादी, काॅंग्रेसला इशारा
शिवसेना हा विस्थापितांचा पक्ष
दरम्यान, आमचं याठिकाणी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी श्रद्धा आहे. आमच्याकडे आदेश चालतो आणि त्या आदेशाची वाट आमदार,खासदार, मंत्री किंवा शिवसैनिक असो प्रत्येकजण आम्ही आतुरतेने बघतो. आम्ही त्या आदेशानुसार चालतो. आम्हाला सत्तेत बसायची सवयच नव्हती. विषयच नाही, कडवा शिवसैनिक ज्याच्या मनगटाच्या ताकदीवरती. त्याने कधी ऊन, वारा, पाऊस, किंवा काही साम, दाम, मिळते की नाही याचा विचार केला नाही, असंही ते म्हणाले. शिवसेना हा विस्थापितांचा पक्ष आहे. त्यांच्या मनगटातील रग ही वेगळीच आहे. ती रग कुठल्याही पक्षाने आजमावयाचा प्रयत्न करू नये.
Read also:
- शिवसेनेतून अनंत गितेंना बाहेरचा रस्ता; शरद पवारांवर केलेली टीका भोवली
- ज्यांना कमी मिळालं त्यांची नाराजी दुर केली जाईल; सावंताच्या नाराजीवर आदित्य ठाकरेंचा सुर
- पवारांनी आयुष्यभर फक्त काड्या लावायचं काम केलं, त्यांचा आडनाव आगलावे करा: सदाभाऊ खोत
- सकाळची सत्ता गेल्यानंतर त्यांचा तडफडेचा ‘हा’ आवाज! नाना पटोलेंची भाजपवर जहरी टिका
- कोल्हापूर उत्तरेत भाजपची प्रचार आघाडी; वाघाची तालीम सदस्यांचा भाजपला पाठींबा जाहीर