मुंबई : भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या पहिले स्मार्ट व्हिलेज दिवाळे गाव होणार आहे. त्यांच्या पहिल्या टप्प्यातील कामाचे उद्घाटन राज्याचे देवेंद्र फडणीवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी भाजप आमदार गणेश नाईक यांनी देवेंद्र फडणवीस यांना भावी मुख्यमंत्री म्हणून संबोधले आहे. त्याचबरोबर त्यांच्यासमोरच त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना देखील भर सभेत खडे बोल सुनावले.
आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला निर्णय
गणेश नाईक म्हणाले की, मी सांगणार नाही की तुम्ही 2 महिन्यात मुख्यमंत्री व्हाल मात्र 2024 नक्कीच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. जनसामान्यांची भावना आहे की ते पण स्वबळावर निवडून येतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच आम्ही सुड घेणार या भावनेने बोलत नाही. पंरतु ज्या ज्या लोकांनी गोरगरिबांचा छळ केला त्या लोकांना त्याचा जवाब द्यावा लागेल हा शब्द गणेश नाईक निश्चितपणे देतो. असं ही गणेश नाईक यांनी म्हटलं आहे.
मोठी बातमी! कोरोना काळातील विद्यार्थांच्या भविष्यासाठी गुन्हे मागे : वळसे पाटीलांची घोषणा
मुंबईत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने नवी मुंबई मनपातील अधिकारी काम करत असल्यचाा आरोप त्यांनी लावला आहे. त्यांचा रोष त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच मनपा अधिकाऱ्यांवर काढला. त्याचबरोबर ते पुढे बोलताना म्हणाले की, अंधार हा कायम राहत नाही. तो उजेड होऊ शकतो. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांना माझा संदेश आहे. कायद्याच्या कचोटीत अयोग्य असणाऱ्या गोष्टी अयोग्य पंरतु कोणाच्या दबावाखाली येऊन तुम्ही त्या गोष्टी करत असाल तर दिवस बदलणार आहेत. अशा इशारा देखील त्यांनी दिला.
आघाडीतील 2 मंत्री अडचणीत येण्याची शक्यता; कार्यक्रमात तलवार पकडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
दरम्यान, पुणे, नाशिक, ठाणे आणि मुंबई सारख्या प्रमुख शहारांत आगामी काही काळात महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय पक्ष जोरदार तयारी सध्या दिसत आहे.
Read also:
- एकट्या राहुला गांधीना दोष देणं शक्य नाही; पक्षात खळखळतं पाणी असलं पाहिजे : सुशिल कुमार शिंदे
- कोथरूड भाजप कार्यकर्त्यांची फौज कोल्हापुरात; सत्यजित कदमांची ताकद वाढली
- कोल्हापूरात प्रचाराचा जोर वाढला; उत्तर पोटनिवडणुकीत भाजपचं पारडं जड
- आशिष शेलार, याद राखा! मुख्यमंत्र्यांबद्दल तोंड सांभाळून बोला, अन्यथा..; शेलारांना शिवसेनेचा इशारा
- उद्धव ठाकरे योग्यवेळी तानाजी सावंतांना समज देतील; ‘त्या’ वक्तव्यावरून सावंताना राष्ट्रवादीकडून इशारा