कोल्हापूर : जस जशी मतदानाची प्रक्रिया जवळ येत आहे तसं तशी कोल्हापूर उत्तरेत राजकीय जुगलबंदी आणखी रंगतदार होताना दिसत आहे. कोल्हापूर ऊत्तरेत भाजप आणि महाविकास आघाडीने आपली पूर्ण ताकद उतरवलेली दिसत आहे. काहीही झाले तरी विजय आपलाच असं दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आणि नेत्यांकडून पाहायला मिळत आहे.
हजारो कोटींचा घोटाळा! दरेकरांना जेलमध्ये टाकलं पाहिजे; आपचे नेते धनंजय शिंदे
भाजपचे कोल्हापूरचे नेते धनंजय महाडिक यांनी महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर भाजप काहीसा बॅकफूटवर जाईल आणि भाजपला नुकसान होईल असं वाटत असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता भाजपची बाजू भक्कम केली आहे. महाविकास आघाडी सरकारला धक्का देत त्यांनी एका नेत्याचा भाजपात प्रवेश करवून घेतला आहे.
गली गली मैं शोर है,प्रवीण दरेकर चोर है! दरेकरांच्या राजीनाम्यासाठी आपचा मुंबईत एल्गार
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संदीप देसाई यांचा मतदानाच्या तोंडावर भाजपात प्रवेश झाल्याने आता भाजपची ताकद वाढली आहे. चंद्रकांत पाटलांनी त्यांचे पक्षात स्वागत करत त्यांना भाजपचे राज्यस्तरावरील पद दिले आहे. भाजपमध्ये प्रवेश करताच देसाई यांची भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संदीप देसाई हे सामाजिक कार्याची जाण असणारे कार्यकर्ते आहेत. त्यांच्यामुळे भाजपचा विचार घरोघरी पोचवून उत्तर मतदारसंघात सत्यजित कदम यांना निवडून आणण्यात त्यांचे मोठे योगदान असेल असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
राजकीय वातावरण तापलं; शरद पवारांवर झालेली टीका अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रत्यत्तर
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर देसाई म्हणाले की, मी नेहमीच राष्ट्रीय विचाराने सामाजिक काम करतो, त्यामुळे मी भाजपकडे आकर्षित झालो. नव्याने पक्ष प्रवेश करून पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि सत्यजित कदम यांना निश्चित फायदा होईल असं काम करून दाखवू असं देखील त्यांनी आश्वासन दिलं आहे.
Read also:
- ” नितेश राणे टायगर नव्हे तर ओरडणारा भालू “; सतीश सावंतांची राणेंवर जहरी टीका
- ३२ वर्ष उलटली, तरीही मुंबईत तसा मी बेघरच; शिवसेनेच्या माजी खासदाराची खंत
- अजित पवार अतिशय हुशार राजकारणी, ते बरोबर वेळ मारून नेतात; चंद्रकांत पाटलांचा पवारांना टोला
- कोल्हापुर पोटनिवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज; 15 उमेदवारांसाठी 2 हजार 200 कर्मचाऱ्यांची नियक्ती
- शरद पवार, युपीएचं अध्यक्ष पद; राष्ट्रवादीच्या नेत्याची महत्वाची प्रतिक्रिया, म्हणाले..;