नवी दिल्ली : राज्यात सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये आलबेल चित्र बघायला मिळत आहे. निधी वाटपावरून शिवसेनेतील काही आमदारांनी जाहीरपणे नाराजी दाखवत राष्ट्रवादी काॅंग्रेसवर हल्लाबोल केला. अशातच आता काॅंग्रेसचेही 25 आमदार महाविकास आघाडी सरकारवर नाराज असल्याची बातमी समोर आली आहे. त्यांनी यासंदर्भात काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीजी भेट देखील घेतली आहे. त्यावरून आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
” वरुण गांधींशी राजकीय भेट नव्हती, मात्र चर्चा झाली”; संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ
चंद्रकांत पाटील म्हणाले की, काॅंग्रेसचे 25-26 आमदार नाराज आहेत. शिवसेनेतील तर अनेक आमदारांनी आपली नाराजी उघडपणे मांडत अर्थसंकल्पीय सत्रात बसणार नसल्याचं म्हटलं आहे. त्यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवेदन देखील दिलं होतं. त्यामुळे या आमदारांची समजूत काढण्यासाठी 2 हजार कोटींचा निधी देण्यात आला, असा निधी देता येत नाही. परंतु अजित पवार हे अतिशय हुशार राजकारणी असून वेळ बरोबर मारून नेतात, असा टोला देखील त्यांनी लगावला.
तुम्ही शिवसेना नाही, सावंतसेना वाढवण्याचा प्रयत्न करू नका; तानाजी सावंतला अंधळकरांनी धो धो धुतलं
आपल्याच पक्षाचे मंत्री आमदारांच्या मतदारसंघात कामासाठी निधी देत नाहीत. तर पक्ष निवडणुकीत चांगली कामगिरी कशी करणार ? असा प्रश्न एका आमदाराने केला आहे. याबाबत द इकॉनॉमिक्स टाईम्सने बातमी दिली आहे. त्यानुसार काॅंग्रसचे 25 आमदारांनी सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याचंही त्यात म्हटलं आहे.
आघाडीत शिवसेना पाठोपाठ काॅंग्रेसही नाराज; काॅंग्रेसचे 25 आमदार सोनिया गांधींची घेणार भेट
दरम्यान, काॅंग्रेसच्या आमदारांच्या समस्या सो़डवण्यासाठी नुकतीच आघाडी सरकारमधील प्रत्येक मंत्र्याला तीन आमदार नेमुन दिले होते. महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील यांनी यांसदर्भात बैठक घेतली होती. तेव्हा आम्हाला माहिती मिळाली. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर काही महिन्यातच हा निर्णय घेण्यात आला होता. परंतु आम्हाला अडिच वर्ष याची माहिती दिली नाही. कोणत्या मंत्र्यांकडे आमची जबाबदारी सोपविली आहे. याबाबत आम्हाला अद्यापही माहिती नाही, असं त्या आमदारांनी सांगितलं आहे.
Read also:
- कोल्हापुर पोटनिवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज; 15 उमेदवारांसाठी 2 हजार 200 कर्मचाऱ्यांची नियक्ती
- शरद पवार, युपीएचं अध्यक्ष पद; राष्ट्रवादीच्या नेत्याची महत्वाची प्रतिक्रिया, म्हणाले..;
- हजारो कोटींचा घोटाळा! दरेकरांना जेलमध्ये टाकलं पाहिजे; आपचे नेते धनंजय शिंदे
- गली गली मैं शोर है,प्रवीण दरेकर चोर है! दरेकरांच्या राजीनाम्यासाठी आपचा मुंबईत एल्गार
- राजकीय वातावरण तापलं; शरद पवारांवर झालेली टीका अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रत्यत्तर