मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा नुकताच कोकण दौरा आयोजित करण्यात आला होता. शिवसेनेची कोकणात विशेष ताकद असल्याने आणि शिवसेनेवर कायम टीका करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे कोकण होम ग्राउंड असल्याने ठाकरेंच्या या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले होते. आदित्य ठाकरे यांनी मात्र दौऱ्यात राणेंकडे स्पष्ट दुर्लक्ष केले आणि त्यांच्यावर बोलणे टाळले.
गली गली मैं शोर है,प्रवीण दरेकर चोर है! दरेकरांच्या राजीनाम्यासाठी आपचा मुंबईत एल्गार
दुसरीकडे आदित्य ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यानंतर सिंधुदुर्गात आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय चिखलफ़ेक सुरु झाली आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर नितेश राणे यांनी केलेल्या टीकेला जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी खोचक शब्दांमध्ये उत्तर दिले आहे.
राजकीय वातावरण तापलं; शरद पवारांवर झालेली टीका अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रत्यत्तर
आमदार नितेश राणे यांना दुसऱ्यांना डिवचण्यापलीकडे दुसरे कुठलेही काम राहिलेले नाही. आदित्य ठाकरेंसारख्या विकासाची दूरदृष्टी असणाऱ्या नेत्यावर टीका करणारे नितेश राणे हे टायगर नसून नुसतंच आरडा-ओरडा करणारे भालू आहेत. नितेश राणें कोकणात ‘भालू इज बॅक’ असे बॅनर लावायला हवेत असा टोलाही सतीश सावंत यांनी हाणला आहे.
” वरुण गांधींशी राजकीय भेट नव्हती, मात्र चर्चा झाली”; संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ
आदित्य ठाकरे हे राज्याच्या विकासासाठी एक व्हिजन घेऊन सर्व जिल्ह्यांमध्ये फिरत आहेत तर नितेश राणेंकडे कोणतेही व्हिजन नाही. त्यांच्याकडे सुपारी घेण्याचे मात्र अवैध व्हिजन आहे. सुपारी घेऊन टीका करणे आणि दहशत पसरवणे. या पलीकडे राणेंचं दुसर व्हिजन नाही अशी खोचक टीका सतीश सावंत यांनी केली आहे. केंद्रात भाजपचे सरकार असताना नितेश राणे हे केंद्राकडून एक रुपयाचा निधी कोकणासाठी आणू शकले नाही. ते केवळ दुसऱ्यांवर टीका करत आहेत. देवगडबाबतचे नीतेश राणे यांचे व्हिजन काय ते स्पष्ट करावे असा संतप्त सवालही सतीश सावंत यांनी उपस्थित केला आहे.
Read also:
- ३२ वर्ष उलटली, तरीही मुंबईत तसा मी बेघरच; शिवसेनेच्या माजी खासदाराची खंत
- अजित पवार अतिशय हुशार राजकारणी, ते बरोबर वेळ मारून नेतात; चंद्रकांत पाटलांचा पवारांना टोला
- कोल्हापुर पोटनिवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज; 15 उमेदवारांसाठी 2 हजार 200 कर्मचाऱ्यांची नियक्ती
- शरद पवार, युपीएचं अध्यक्ष पद; राष्ट्रवादीच्या नेत्याची महत्वाची प्रतिक्रिया, म्हणाले..;
- हजारो कोटींचा घोटाळा! दरेकरांना जेलमध्ये टाकलं पाहिजे; आपचे नेते धनंजय शिंदे