मुंबई : मुंबईचा एवढा गांभीर्यानं विचार माझ्या मंत्रीमंडळातील मंत्र्याएवढा कुणी केला नव्हता. त्याचा उल्लेख थेट सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून केला गेला. राज्यात काही योजना करायच्या आहेत परंतु आपल्या हातात नाही. तसेच महाविकास आघाडी फक्त घोषणा देत नाही तर काम करून दाखवत आहे. आम्ही दिलेला शब्द पाळतो, तसंच मुंबईत आमदारांना घरं देणार असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केलं होतं. आता याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी आमदार,खासदार असलेले चंद्रकांत खैरेंनी मुंबईत घर मिळालं नसल्याची खंत व्यक्त केली आहे.
राजकीय वातावरण तापलं; शरद पवारांवर झालेली टीका अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रत्यत्तर
चंद्रकांत खैरे म्हणाले की, राज्याच्या राजकारणात मला जवळपास ३२ वर्ष उलटली आहेत. मात्र अद्यापही मला मुंबईत घर मिळालं नाही. आमदार आणि गृहनिर्माण मंत्रिपद भूषवून देखील मला मुंबईत घर नाही. आज मागे वळून पाहताना ३२ वर्ष उलटली आहे. तरीही मुंबईत तसा मी बेघरच आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात लवकरच घर मिळणार आहे. त्यामुळे अशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. असंही त्यांनी चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे.
” वरुण गांधींशी राजकीय भेट नव्हती, मात्र चर्चा झाली”; संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ
मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याबाबत शरद पवार म्हणाले होते की, केवळ आमदारांसाठी गृहनिर्माण योजना नको. गृहनिर्माण योजनेतील घरांमध्ये आमदारांसाठी कोटा ठेवावा, हे योग्य आहे. मात्र त्या आमदारांना घर देताना त्याची योग्य ती किंमत घेतली पाहिजे. इतकंच नाही तर शरद पवार राज्य सरकारच्या या निर्णयाबाबत पक्षातील मंत्र्यांशी चर्चाही करणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं.
तुम्ही शिवसेना नाही, सावंतसेना वाढवण्याचा प्रयत्न करू नका; तानाजी सावंतला अंधळकरांनी धो धो धुतलं
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत आमदारांना घर देण्याची घोषणा करताच त्यावरून तिखट प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलं. त्यांनी त्याबाबत एक ट्विट केलं. त्यात त्यांनी आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतोय. मी स्पष्ट करू इच्छितो की,सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत+बांधकाम खर्च (अपेक्षित खर्च 70 लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे. असं म्हटलं होतं.
Read also:
- अजित पवार अतिशय हुशार राजकारणी, ते बरोबर वेळ मारून नेतात; चंद्रकांत पाटलांचा पवारांना टोला
- कोल्हापुर पोटनिवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज; 15 उमेदवारांसाठी 2 हजार 200 कर्मचाऱ्यांची नियक्ती
- शरद पवार, युपीएचं अध्यक्ष पद; राष्ट्रवादीच्या नेत्याची महत्वाची प्रतिक्रिया, म्हणाले..;
- हजारो कोटींचा घोटाळा! दरेकरांना जेलमध्ये टाकलं पाहिजे; आपचे नेते धनंजय शिंदे
- गली गली मैं शोर है,प्रवीण दरेकर चोर है! दरेकरांच्या राजीनाम्यासाठी आपचा मुंबईत एल्गार