कोल्हापूर : कोल्हापूर ऊत्तरेत भाजप आणि महाविकास आघाडीने आपली पूर्ण ताकद उतरवलेली दिसत आहे. काहीही झाले तरी विजय आपलाच असं दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आणि नेत्यांकडून पाहायला मिळत आहे. जस जशी मतदानाची प्रक्रिया जवळ येत आहे तसं तशी कोल्हापूर उत्तरेत राजकीय जुगलबंदी आणखी रंगतदार होताना दिसत आहे. भाजपचे नेते आणि माजी खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांनी सत्यजित कदम यांच्या प्रचारात महिलांविषयी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता धनंजय महाडिक यांनी एका पत्राद्वारे वक्तव्याचा सारवासारव केली आहे.
कोल्हापुर पोटनिवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज; 15 उमेदवारांसाठी 2 हजार 200 कर्मचाऱ्यांची नियक्ती
ते म्हणाले की, कोल्हापुर उत्तरची निवडणुक बिनविरोधक होणार अशी वग्लना करणाऱ्यांना भाजपने सडेतोड आव्हान दिलं आहे. भाजपला मिळणारा प्रतिसाद पाहुन काॅंग्रेस नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. काॅंग्रेसच्या नेत्यांनी आपल्या वक्तव्याची मोडतोड करून राजकीय षड़यंत्र रचले आहे. भागीरथी संस्थेच्या माध्यमातून गेल्या 15 वर्षात हजारो महिलांना न्याय दिला. महिलांना सन्मान आणि आदर करण्याची महाडिक घराण्याची परंपरा आहे. स्वप्नातही आपल्याकडून कोणत्याही महिलेचा कधीच अवमान होणार नाही. असं त्यांनी म्हटलं आहे.
शरद पवार, युपीएचं अध्यक्ष पद; राष्ट्रवादीच्या नेत्याची महत्वाची प्रतिक्रिया, म्हणाले..;
काँग्रेसच्या उमेदवाराबद्दल बोलताना धनंजय महाडिक यांनी म्हटलं आहे काँग्रसचे लोक येतील आणि तुम्हाला सांगतील आम्ही एक महिला उभी केली आहे. ती महिला चांगली आहे, बिचारी आहे. तुम्ही सगळ्या महिला आहात आणि एका महिलेला निवडून आण्यासाठी आवाहन करतील. जर तुमचा पती समजा एखादा प्लम्बिंग वाला असेल किंवा इतर काही क्षेत्रात काम करत असेल तर ते तुमहाला येईलच असं काही नाही. तुमचा पती इलेक्ट्रिशियन असेल तुम्हाला ते काम जमणार आहे का ? ज्याचं काम त्यानं करायचं असतं, ते दुसऱ्याला जमत नाही असं वक्तव्य धनंजय महाडिक यांनी केलं होतं.
हजारो कोटींचा घोटाळा! दरेकरांना जेलमध्ये टाकलं पाहिजे; आपचे नेते धनंजय शिंदे
दरम्यान, धनंजय महाडिक यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार आहे. कोल्हापुरात आज या वक्तव्याचा निषेध म्हणून काळे ड्रेस आणि काळी साडी परिधान करून महिलांकडून आंदोलन केले जाणार आहे. कावळा नाका परिसरात हे आंदोलन होणार आहे.
Read also:
- नववर्षाच्या शुभमुहूर्तावर एसटी कर्मचाऱ्यांना शेवटचा सातवा अल्टिमेटम; थेट कारवाईचा परिवहन मंत्र्यांचा इशारा
- कोल्हापुर उत्तर पोटनिवडणुक! मतदानाच्या तोंडावरच चंद्रकांत पाटलांनी फोडला आघाडीचा ‘हा’ नेता
- ” नितेश राणे टायगर नव्हे तर ओरडणारा भालू “; सतीश सावंतांची राणेंवर जहरी टीका
- ३२ वर्ष उलटली, तरीही मुंबईत तसा मी बेघरच; शिवसेनेच्या माजी खासदाराची खंत
- अजित पवार अतिशय हुशार राजकारणी, ते बरोबर वेळ मारून नेतात; चंद्रकांत पाटलांचा पवारांना टोला