नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमात देशातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्य़ार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलीत. सध्या डिजिटल क्रांतीमुळे ऑनलाईन पद्धतीचं शिक्षण घेण्यास बरेच अडथळे येतात. अशा अडथळ्यानंतरही अभ्यासावर कशा पद्धतीन लक्ष केंद्रीत करावं असा प्रश्न नरेंद्र मोदींना एका विद्य़ार्थ्यांने विचारला. त्यावर नरेंद्र मोदींनी उत्तर देखील दिलं.
कोल्हापुर उत्तर पोटनिवडणुक! मतदानाच्या तोंडावरच चंद्रकांत पाटलांनी फोडला आघाडीचा ‘हा’ नेता
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रश्नांवर उत्तर देतांना प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यालाच कोंडीत पकडलं. ते म्हणाले की, ऑनलाईन अभ्यास करता वेळी तुम्ही वाचन करता की रिल पाहता.? मी तुम्हाला याबाबत हात वरती करण्यास नाही सांगणार. नरेंद्र मोदींनी केलेल्या या वक्तव्यावर विद्य़ार्थी खळखळून हसायला लागलेत.
” नितेश राणे टायगर नव्हे तर ओरडणारा भालू “; सतीश सावंतांची राणेंवर जहरी टीका
तसेच पुढे बोलतांना ते म्हणाले की, अडथळे आणणाऱ्या हजारो माध्यमांमुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित होते. असे नेहमी म्हटलं जातं. यावर खरी समस्या माध्यम नाही तर मन ही समस्या आहे. माध्यम ऑनलाईन असो वा ऑफलाईन असो. मात्र माझं मन पुर्णपणे अभ्यासात व्यग्र आहे, माझी जी शोधक वृत्ती आहे, ती विषयातल्या बारकाव्यांना पकडण्याचा प्रयत्न करत आहे, असं समजलं तर तुमच्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन कोणत्याही पद्धतीने शिकलं तरी काहीही फरक पडणार नाही. असंही ते म्हणालेत.
३२ वर्ष उलटली, तरीही मुंबईत तसा मी बेघरच; शिवसेनेच्या माजी खासदाराची खंत
दरम्यान, युग बदलते तशी माध्यमंही बदलत आहेत. पूर्वी सर्व शिक्षण कंठस्थ असे. श्रवणशक्तीद्वारेच अनेक पिढ्यांनी शिक्षण आत्मसात केले. त्यानंतर छपाईचं युग आलं तेव्हा लोकांनी त्यात स्वतत:ला बदलून घेतलं. ही क्रांती सातत्याने सुरूच असते. आज आपण डिजिटल माध्यमातून, नव्या तंत्रज्ञानाच्या टुल्सद्वारे शिकत आहोत. हे एक व्यापक युग आहे. ही आपण संधी म्हणून स्वीकारले पाहिजे. समस्या म्हणून याकडे पाहु नये. ऑनलाईन शिक्षण एक रिवॉर्ड म्हणून पहा. शिक्षकांच्या नोट्स आणि ऑनलाईन शिक्षणातील नोट्स पडताळून पाहिल्यास तुम्हाला काहीतरी नवं सापडले. त्यातून तुमची ताकद वाढेल, असा सल्ला देखील नरेंद्र मोदींनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला आहे.
Read also:
- केंद्रीय अतिरेकी तपास यंत्रणांना घुसवलं जातंय; राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप
- “अनिल परब बरोबरच नंतर हसन मुश्रिफांचा नंबर”; किरीट सोमय्यांचा आघाडीला कडक इशारा
- इतिहास सांगतो, आमुच्या स्त्रीने शत्रू तुडवला! चित्रा वाघ धनंजय महाडिकांवर कडाडल्या
- ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यांवर माफी नाहीच; धनंजय महाडिकांची सारवासारव
- नववर्षाच्या शुभमुहूर्तावर एसटी कर्मचाऱ्यांना शेवटचा सातवा अल्टिमेटम; थेट कारवाईचा परिवहन मंत्र्यांचा इशारा