अहमदनगर : आगामी 2024 च्या निवडणुकीसाठी भाजपने जोरदार कंबर कसली आहे. महापालिका, विधानसभा आणि लोकसभा हा स्वबळावर लढणार असल्याचं भाजपने ठरवलं आहे. त्यासाठी भाजपने मोठ्या नेत्यांची फौर तयार करून प्रत्येक नेत्यांकडे दोन लोकसभा मतदार संघ, तसेच त्या मतदार संघातील विधानसभा मतदार संघाची जबाबदारी सोपवली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अहमदनगर आणि सोलापुर मतदार संघाची जबाबदारी दिल्याने राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते रोहित पवारांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
केंद्रीय अतिरेकी तपास यंत्रणांना घुसवलं जातंय; राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप
रोहित पवार म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे नेते कमी पडतात म्हणूनच भाजपने मिशन- 2024 अंतर्गत देवेंद्र फडणवीसांकडे नगर जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. सध्या अहमदनगर जिल्ह्यात भाजपचे माजी मंत्री राम शिेंदे, राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील असे महत्वाचे नेते आहे. मात्र भाजपवर टीका करताना रोहित पवारांनी या नेत्यांचे नाव न घेतले. पंरतु त्यांचा निशाणा यांच्यावरच होता.
“अनिल परब बरोबरच नंतर हसन मुश्रिफांचा नंबर”; किरीट सोमय्यांचा आघाडीला कडक इशारा
मिशन 2024 साठी भाजपच्या नेत्यांना मतदारसंघातील पक्षबांधणीपासून सदस्य नोंदणीस बुथ लेव्हलचा कार्यकर्ता जबाबदारी, स्थानिक राजकीय गणिते, स्थानिक राजकारण अशी सगळी गणित साधत प्रत्येक मतदार संघ भाजपकरीत मजबुत करण्याचे उदिष्टे् दिले असल्याचं समजत आहे. त्या हेतुने भाजपने या नेत्यांची यादी तयार केली आहे.
इतिहास सांगतो, आमुच्या स्त्रीने शत्रू तुडवला! चित्रा वाघ धनंजय महाडिकांवर कडाडल्या
दरम्यान, यात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोलापुर, अहमदनगर, चंद्र्कांत पाटील यांच्याकडे ठाणे ग्रामीण आणि नाशिक, सुधीर मुंनगंटीवार -बीड, जालना, पंकजा मुंडे- कोल्हापुर सांगली. आशिष शेलार- रत्नागिरी, सिंधुदुर्ग, श्रीकांत भारतीय- नांदेड, परभणी, चंद्रशेखर बावनकुळे- अकोला, अमरावती, प्रवीण दरेकर- पालघर मिरा भाईंदर, गिरीष महाजन- उस्मानाबाद, हिंगोली, संजय कुटे – दक्षिण रायगड, उत्तर रायगड, रविंद्र चव्हाण- सातारा, पुणे ग्रामीण, रावसाहेब दानवे- बुलढाणा, नंदुरबार, संभाजी पाटिल निलंगेकर- गोंदिया, भंडारा असं दिलं आहे.
Read also:
- मुख्यमंत्रीपद असताना गृहमंत्रीपद मागणे, म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे! मुनगंटीवारांचा टोला
- गृहखात्यालाच दमदार पावलं टाकावी लागेल, नाही तर तुमच्यासाठी रोज नवा खड्डा: संजय राऊत
- गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज असणाऱ्या बातम्यांचं मुख्यमंत्र्यांकडून खंडण; म्हणाले..;
- सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला पुन्हा दणका! अनिल देशमुखांच्या संबंधित याचिका फेटाळली
- ऑनलाईन शिक्षणात हजारो अडथळ्यांमुळे अभ्यासावर लक्ष कसं केंद्रीत करावं? मोदींनी सांगितला जबरदस्त उपाय