मुंबई : राज्यात गृहखातं शिवसेनेला तर मुख्यमंत्री राष्ट्रवादी काॅंग्रेसला मिळणार असल्याच्या बातम्या सध्या सोशल मीडियावर फिरत होत्या. त्या सगळ्या बातम्यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खंडण केलं आहे. या मुद्दयावरून सध्या भाजपचे नेते शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसवर शाब्दिक हल्ला चढवत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंवर शेलक्या शब्दात टीका केलीय.
ऑनलाईन शिक्षणात हजारो अडथळ्यांमुळे अभ्यासावर लक्ष कसं केंद्रीत करावं? मोदींनी सांगितला जबरदस्त उपाय
चंद्रकांत पाटिल राष्ट्रवादी काॅंग्रेसवर बोलतांना म्हणाले की, राष्ट्रवादी पक्ष हा महाविकास आघाडीचा रिमोट आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना आपण गृहखाते तुमच्याकडे ठेवा अशी विनंती केली होती. हे खाते दिल्यास राष्ट्रवादीचे नेते मातोश्रींवर कॅमेरे लावतील, असा इशारा देखील त्यांनी दिला. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, परंतु मुख्यमंत्र्यांनी हा सल्ला मानला नाही. आता नव्याने सल्ला देण्याची वेळ निघून गेली असल्याचंही ते म्हणालेत.
केंद्रीय अतिरेकी तपास यंत्रणांना घुसवलं जातंय; राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप
राष्ट्रवादी काॅंग्रेस हा स्वार्थी पक्ष असून तो सत्तेसाठी कोणालाही सोबत घ्यायला तयार असतो. त्यामुळे भूमिका बदलणारा हा पक्ष दगा देणारा आहे, असा टोला देखील चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसला लावला. सांगलीतील अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या उद्घाटनास देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिलं नाही. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कोरोना संकटावेळी त्यांच्याशी चर्चा करून काही निर्णय घेतले असते तर मार्ग निघाला असता. परंतु आघाडीतील नेते फार छोट्या मनाची असल्यामुळे लोकहिताचे निर्णय झाले नाही. अशीही टिका त्यांनी केली.
“अनिल परब बरोबरच नंतर हसन मुश्रिफांचा नंबर”; किरीट सोमय्यांचा आघाडीला कडक इशारा
दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या अदलाबदलीची शक्यता वर्तवली जात होती. गृहखातं भाजपबाबत मवाळ असलेल्या सेना अस्वस्थ, काॅंग्रेसच्या नेत्यांवरही कारवाई झाल्याने ते देखील नाराज असल्याची माहिती समजत होती. भाजपचे नेते, नारायण राणे, प्रसाद लाड, किरीट सोमय्या, नितेश राणे, मोहित कंबोज या सगळ्यांबाबात कारवाया करताना पोलिसांनी कारवाई सुमार राहिल्याची काही नेत्यांनी टिका केली होती.
Read also:
- फडणवीसांकडे अहमदनगर, सोलापुरची जबाबदारी; रोहित पवारांचा शिंदे, विखेंना चिमटा
- मुख्यमंत्रीपद असताना गृहमंत्रीपद मागणे, म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे! मुनगंटीवारांचा टोला
- गृहखात्यालाच दमदार पावलं टाकावी लागेल, नाही तर तुमच्यासाठी रोज नवा खड्डा: संजय राऊत
- गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज असणाऱ्या बातम्यांचं मुख्यमंत्र्यांकडून खंडण; म्हणाले..;
- सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला पुन्हा दणका! अनिल देशमुखांच्या संबंधित याचिका फेटाळली