कोल्हापूर : उत्तरेत मतदानाची प्रक्रिया जशी जवळ येत आहे तसं राजकारणाला ऊत आलेला दिसत आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात कांटे की टक्कर कोल्हापुरात पाहायला मिळणार आहे हे मात्र आता नक्की झालं आहे. भाजपचे नेते धनंजय महाडिक यांनी सत्यजित कदम यांचा प्रचार करत असताना महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. काँग्रेसच्या उमेदवाराबद्दल बोलताना धनंजय महाडिक यांनी म्हटलं आहे की, काँग्रसचे लोक येतील आणि तुम्हाला सांगतील आम्ही एक महिला उभी केली आहे. ती महिला चांगली आहे, बिचारी आहे.
फडणवीसांकडे अहमदनगर, सोलापुरची जबाबदारी; रोहित पवारांचा शिंदे, विखेंना चिमटा
तुम्ही सगळ्या महिला आहात आणि एका महिलेला निवडून आण्यासाठी आवाहन करतील. मात्र आपल्या पतीचं काम आपल्याला जमेलच असं नाही, ज्याचं काम त्यानं करायचं असतं, ते दुसऱ्याला जमत नाही, असं वक्तव्य धनंजय महाडिक यांनी केलं होतं. याला जयश्री जाधव यांनी आता तिखट शब्दात उत्तर दिले आहे.
मुख्यमंत्रीपद असताना गृहमंत्रीपद मागणे, म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे! मुनगंटीवारांचा टोला
भाजपच्या सध्याच्या ज्या नेत्यांकडून महिलेला आमदारकी झेपणार नाही असा प्रचार केला जात आहे त्या नेत्यांनी म्हणजेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी मला उमेदवारीची ऑफर का दिली होती ? असा खडा सवाल जयश्री जाधव यांनी मुन्ना महाडिकांना विचारला आहे. एवढंच नाही तर ही निवडणूक भावनेवर नाही तर विकासकामांवर लढत असल्याचेही त्यांनी खडसावून सांगितले आहे.
गृहखात्यालाच दमदार पावलं टाकावी लागेल, नाही तर तुमच्यासाठी रोज नवा खड्डा: संजय राऊत
महाआघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा काल मेळावा घेण्यात आला. यामध्ये जयश्री जाधव यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी जयश्री जाधव यांना निवडून आण्यासाठी हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करून ५० हजार मताधिक्क्याने विजयी करावे, असं आव्हान केलं आहे.
Read also:
- कोल्हापुरात भाजपचं वजन वाढलं; एसटी संघटना, हिंदू एकता आंदोलन समितीचा भाजपला पाठींबा
- मोठी बातमी ! आर्यन खान प्रकरणातील मुख्य साक्षीदार प्रभाकर साईलंच निधन
- देशाला ३४ वर्षानंतर मोदींनी नवीन शैक्षणिक धोरण दिलं; विखे पाटलांकडून मोदींचं कौतुक
- काळजी करू नका, सुधारणेला वाव असेल तर सुधारणा करू! वळसे पाटलांचा राऊतांना शब्द
- राष्ट्रवादी काॅंग्रेस हा स्वार्थी पक्ष असून तो सत्तेसाठी..; चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीवर निशाणा