पुणे : गेल्या काही महिन्यांपासून राज्यात राजकीय चिखलफेक काही थांबायचं नाव घेत नाही. दररोज सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतच असतात. या राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या राजकीय प्रदूषणाबद्दल राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पर्यायी इंधन परिषदेतील प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
पार्थ पवार कोरेगावच्या राजकारणात? “वेल कम टु कोरेगाव” म्हणत शिवसेना नेत्याचं आव्हान
राज्यात पॉलिटिकल प्रदूषण वाढले आहे का ? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारलं असताना आदित्य ठाकरे यांनी थ्री व्हीलरचं चांगलं चालू आहे असं भन्नाट उत्तर दिलंय. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यांची चर्चा सध्या राज्यात जोरदार सुरू आहे.
साईलचा मनसुख हिरेन तर करण्यात आलेला नाही ना? भाजपचा राज्य सरकारला सवाल
पुण्यात आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पर्यायी इंधन परिषदेतील प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे पुढे म्हणाले ,”पुणे हे शहर ऑटोमोबाईल साठी प्रसिद्ध आहे. पुणेकरांनी या प्रदर्शनात यावं इथे त्यांना चांगले पर्याय मिळतील. ज्या नागरिकांना इलेक्ट्रिक गाडी घ्यायची आहे त्यांच्यासाठी हे प्रदर्शन आहे. राज्यात स्टार्टअप खूप आहेत आता त्यांना स्केल अप करायचे आहे. तर महाराष्ट्रात येत्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात चार्जिंग स्टेशन दिसतील.” असं आदित्य ठाकरे म्हणालेत.
सरकार पाडण्याच्या गुढ्या मनात उभारणाऱ्यांना चोख उत्तर; मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला
दरम्यान, “पर्यायी इंथान कुठल मिळेल याचा विचार चालू आहे. महाराष्ट्रात देखील स्क्रॅपिंग पॉलिसी येत्या काही दिवसात राबवणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणालेत.” पुणे हे मुख्य केंद्र आहे बाकीचे ठिकाण त्यांना फॉलो करतील. असं देखील ठाकरे यावेळी म्हणाले.
Read also:
- “भाजपमुळे देशात जनता रोज एप्रिल फुलमध्ये जगतेय” नाना पटोलेंची मिश्कील टीका
- काॅंग्रेसचे ते २५ आमदार दिल्लीत प्रशिक्षण घेणार; नाराज नसल्याचं काॅंग्रेसच्याच नेत्यांनी सांगितलं
- पंच प्रभाकर साईलचा मृत्यू संशयास्पद! वळसे पाटलांनी दिले चौकशी करण्याचे आदेश
- मराठी माणसाच्या भाषेवरून अजित पवारांची चौफेर टोलेबाजी; मुख्यमंत्र्यांसमोरच सांगितला किस्सा
- काॅंग्रेसच्या नेत्यांनं आव्हांडासमोर बांधलं हाताला घड्याळ; अन् काॅंग्रेसच्या आमदारांनं काढला पळ