मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलिकडेच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठी भाषा भवनासाठी 100 कोटीची घोषणा केली. मुंबईत आज गुढीपाडव्याच्या शुभमुर्हतावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी मराठी भाषेचं महत्व सांगताना अनेक किस्से सांगितले. त्यावेळी उपस्थित असणाऱ्यां लोकांमध्ये एकदमच हशा पिकला.
कोल्हापुरात भाजपचं वजन वाढलं; एसटी संघटना, हिंदू एकता आंदोलन समितीचा भाजपला पाठींबा
अजित पवार म्हणाले की, इतर भाषिक भेटतात, तेव्हा एकमेकांशी स्वत:च्या मातृभाषेत बोलतात. परंतु तुम्ही मुंबईत अनुभव घ्या. दोन मराठी माणसं भेटली, तर तुम्हीच सांगा ते एकमेकांशी कोणत्या भाषेत बोलतात? सुरूवातीला इंग्रजीत बोलतील. मग त्यांचं इंग्रजी थकतं. मग दोघंही अडखळतात. मग हिंदीवर येतात. मग हिंदीतून सुरुवात होते. त्यापेक्षा दोघांनी जर मराठीतच बोललं तर मराठी भाषेबद्दल आपपल्याला प्रेम नाही का? त्याबद्दल न्युनगंड असेल तर आपल्या भाषेचा विकास कसा होईल? असा सवाल देखील त्यांनी केलं आहे.
मोठी बातमी ! आर्यन खान प्रकरणातील मुख्य साक्षीदार प्रभाकर साईलंच निधन
मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची मराठी भाषा आम्ही जवळून अनुभवतोय. त्यांची मराठी भाषा वेगळी आहे. हळूहळू बोलत असताना ते गुदगुल्या करतात. शालजोडीतून मधूनच समोरच्याचं वस्त्रहरण करणारी उद्धव ठाकरे यांची मराठी भाषा आहे. हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं अस्त्र आहे. आदित्य ठाकरे देखील चांगलं मराठी बोलतात. महाराष्ट्राला आपलंसं करून घेण्याची ताकद त्यांच्यामध्ये असल्याचंही ते म्हणालेत.
देशाला ३४ वर्षानंतर मोदींनी नवीन शैक्षणिक धोरण दिलं; विखे पाटलांकडून मोदींचं कौतुक
दरम्यान, मराठी भाषासंबंधी गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारकडून महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. त्याचबरोबर मराठी भाषा वाढविण्यासाठी मुंबईतील सगळ्या दुकांनावर मराठी भाषेत पाट्या सक्ती केली आहे.
Read also:
- काॅंग्रेसच्या नेत्यांनं आव्हांडासमोर बांधलं हाताला घड्याळ; अन् काॅंग्रेसच्या आमदारांनं काढला पळ
- पार्थ पवार कोरेगावच्या राजकारणात? “वेल कम टु कोरेगाव” म्हणत शिवसेना नेत्याचं आव्हान
- साईलचा मनसुख हिरेन तर करण्यात आलेला नाही ना? भाजपचा राज्य सरकारला सवाल
- सरकार पाडण्याच्या गुढ्या मनात उभारणाऱ्यांना चोख उत्तर; मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला
- तर चंद्रकांत पाटील ऑफर का घेऊन आले मग ? मुन्ना महाडिकांना जयश्री जाधवांचे तिखट उत्तर