मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज्यातील राजकीय नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर देखील त्यांनी निशाणा साधला. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सरकार स्थापनेवरून जोरदार टीका केली. त्यानंतर राज्यातील विविध नेत्यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. अशातच आता मराठी अभिनेत्री प्रजाक्ता माळी हिने काल झालेल्या राज ठाकरे यांच्या भाषणावर भाष्य़ केलं आहे.
राष्ट्रवादीमुळे जातीयवाद फोफावलाय; राज ठाकरेंचा शरद पवारांंवर निशाणा
प्रजाक्ता माळी हिने तिच्या फेसबुक पेजवर लिहिलं आहे की, नाही नाही. कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला नाही. काल आयूष्यात पहिल्यांदा राजकीय सभा अनुभवली. ती खूप दिवसांपासून अनुभवायचीच होती. ते फक्त तुमच्याबरोबर शेअर करतेय इतकाच हेतू. कलाकार नंतर आधी मी माणूस- सामाजिक प्राणी आहे; त्याच्या समृद्धी करता पण झटायला हवं. म्हणून हा घाट. आता माझ्या आधार कार्ड वर मुंबईचा पत्ता आहे. असं तिने म्हटलं आहे. त्याचबरोबर तिने सर्वांगीण विकास, समग्रजीवन यासह राजकारण, मुंबई हे हॅशटॅग वापरले आहेत.
मुख्यमंत्री, गृहमंत्रीपदाच्या बातम्यांवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, मला तर..;
तसेच राज ठाकरे यांच्यावर टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कोवीड काळातील काम आपण पाहिलं आहे. आम्ही कामाचा विकास धडाका लावला. कोवीड कमी होताच आम्ही लोकापर्णाची कामं सुरू आहेत. बाळासाहेबांचा उत्तराधिकारी उद्धव ठाकरेंचं आहेते हे पुऩ्हा सिद्ध झालं आहे बाकी डुप्लिकेट लोकांंचं काम नाही. ज्या पक्षात उद्धव ठाकरे होते. त्यात काय घडलं हे सगळ्यांना माहित आहे. असंही त्या म्हणाल्यात.
“निवडणुकीनंतर सेना प्रमुखांना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आठवलं, आधी झोपले होते का?”
अजित पवार म्हणाले की, व्वा रं पठ्ठा… साहेबांचं सगळं राजकारण बघितलं तर कुठे जातीयवादी राजकारण दिसणार नाही. त्यांनी सर्व धर्म समभावानं राजकारण केलं. परंतु हा पठ्ठा म्हणतो. जातीचं राजकारण केलं काय बोलावं आता. कुणीही सांगावं साहेबांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं. साहेबांचे पहिल्यापासून ते आता पर्यंतचे निर्णय काढून बघा ना. त्यामध्ये कुणीही दाखवावं. त्यांनी जातीपातीचं राजकारण केलं. प्रत्येकवेळी त्यांनी सर्व धर्म समभाव हीच भूमिका ठेवून मार्गक्रमण केलं असंही त्यांनी म्हटंल आहे.
Read also:
- व्वा रं पठ्ठा…,काय बोलावं आता? अजित पवारांकडून खास दादा स्टाईलने राज ठाकरेंना प्रत्युत्तर
- “मोरी तुंबली आहे वाटलं, काही तरी निघेल, पण भाजपचं गांडूळ निघालं”;
- “इडी काय राष्ट्रवादीचा पिच्छा सोडत नाही”; शिवसेनेच्या नेत्याची तक्रार अन् राष्ट्रवादी नेत्याच्या घरी इडी
- पवार साहेबांचं नाव घेतल्याशिवाय हेडलाईन बनत नाही; सुप्रिया सुळेंचा राज ठाकरेंना टोला
- भुजबळ, पिचड, अरूण गुजराथी हे कोणते नेते मग? राज ठाकरेंच्या जातीयवादाच्या टिकेला पवारांचं प्रत्युत्तर