मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज्यातील राजकीय नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर देखील त्यांनी निशाणा साधला. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सरकार स्थापनेवरून जोरदार टीका केली. त्यानंतर राज्यातील विविध नेत्यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. अशातच आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरे यांच्यावर शेलक्या भाषेत भाष्य केलं आहे.
मुख्यमंत्री, गृहमंत्रीपदाच्या बातम्यांवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, मला तर..;
किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, राज ठाकरे यांचं कालंचं झालेलं भाषण हे भाजपने लिहून दिलं होतं. आम्हालाही लोकं विचारतात लाव रे तो व्हिडीओ, शिवसेनेचा द्वेष करण्यासाठी स्वत:पक्ष काढला का असा प्रश्न निर्माण होतो. कालच्या त्यांच्या भाषणाबाबत बऱ्याच मनसैनिकांनी आम्हाला सांगितलं की, मोरी तुंबली आहे वाटलं, काही तरी निघेल पण भाजपचं गांडूळ निघालं. असा टोला त्यांनी राज ठाकरे यांना लगावला.
भाजपला सांगलीत मोठा धक्का! भाजपच्या माजी मंत्र्यांचा राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कोवीड काळातील काम आपण पाहिलं आहे. आम्ही कामाचा विकास धडाका लावला. कोवीड कमी होताच आम्ही लोकापर्णाची कामं सुरू आहेत. बाळासाहेबांचा उत्तराधिकारी उद्धव ठाकरेंचं आहेते हे पुऩ्हा सिद्ध झालं आहे बाकी डुप्लिकेट लोकांंचं काम नाही. ज्या पक्षात उद्धव ठाकरे होते. त्यात काय घडलं हे सगळ्यांना माहित आहे. असंही त्या म्हणाल्यात.
“गांधी, नेहरूंचा आदर सन्मान करण्याऐवजी, त्यांच्यावर टिका टिप्पणी केली जातेय”; शरद पवारांची खंत
दरम्यान, राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर टीका करताना म्हणाले की, राज्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या जन्मानंतर जातीयवाद वाढला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी लोकांची फसवणूक केली असल्याची टीका त्यांनी केली आहे. त्यावर राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
Read also:
- “इडी काय राष्ट्रवादीचा पिच्छा सोडत नाही”; शिवसेनेच्या नेत्याची तक्रार अन् राष्ट्रवादी नेत्याच्या घरी इडी
- पवार साहेबांचं नाव घेतल्याशिवाय हेडलाईन बनत नाही; सुप्रिया सुळेंचा राज ठाकरेंना टोला
- भुजबळ, पिचड, अरूण गुजराथी हे कोणते नेते मग? राज ठाकरेंच्या जातीयवादाच्या टिकेला पवारांचं प्रत्युत्तर
- राष्ट्रवादीमुळे जातीयवाद फोफावलाय; राज ठाकरेंचा शरद पवारांंवर निशाणा
- “निवडणुकीनंतर सेना प्रमुखांना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आठवलं, आधी झोपले होते का?”