अमरावती : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच कोरोनाबाधित घुसल्याने एकच धांदल उडाली. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी एक 35 वर्षीय कोरोना बाधित आत घुसला. राजेश टोपे हे कोरोना संदर्भात आढावा घेण्यासाठी अमरावतीत आले होते.
आरोग्यमंत्र्यांसमोरच कोरोनाग्रस्त खुलेआम फिरत असल्याचे बघून सर्वांचीच फजिती झाली. जिल्हा रुग्णालयात दाखल न केल्याने रुग्णाला आरोग्यमंत्र्यांची भेट घ्यायची होती.
मी कोरोनाग्रस्त असल्याचे निदान झाल्यानंतरही जिल्हा रुग्णालयात दाखल न केल्याचा आरोप रुग्णाने केला. तसेच आरोग्यमंत्र्यांना भेटण्याची मागणी त्याने केली. टोपेंना भेटल्याशिवाय कुठेही जाणार नसल्याचं तो म्हणाला. ला दाखल करण्यासाठी प्रशासनाने खूप प्रयत्न केले पण तो कोणाचंही ऐकायला तयार नव्हता. शेवटी पत्रकार परिषद संपल्यावर त्याला रुग्णवाहिकेतून कोविड रुग्णालयात नेले.