चंदीगड : गेली अनेक दिवसांपासून कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहे. पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या या आंदोलना देशभरातून पाठिंबा मिळत आहे. मात्र सरकारशी अनेकदा चर्चा होऊनही अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.
शेतकरी कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवरून अडून आहेत. आपला विरोध दर्शवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा वापर करत आहे. कृषी कायद्याविरोधात पंजाबमध्ये सर्वाधिक आक्रोश पाहण्यास मिळत आहे. आपला विरोध दर्शवण्यासाठी काही शेतकऱ्यांनी भाजप नेत्याच्या घरासमोर चक्क शेणच आणून टाकल्याची घटना समोर आली आहे.
शेतकरी आंदोलनाला समर्थन करणाऱ्या काही लोकांनी शुक्रवारी हरियाणामध्ये राहणारे पंजाब सरकारमधील माजी मंत्री तीक्ष्ण सूद यांच्या घरसामोर शेणाने भरलेली संपूर्ण ट्रॉलीच खाली केली. ज्यांनी ही ट्रॉली माजी मंत्र्यांच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर खाली केली ते सर्वजण शेतकरी असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे संतापलेल्या सूद यांनी देखील याविरोधात आंदोलन केले.
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनीही या घटनेची दखल घेत शेतकऱ्यांना इशारा देत कायदा हातात न घेण्याचं आवाहन केले आहे.
Read Also :
- नव्या कोरोना व्हायरसचे थैमान, ‘या’ देशाने पुन्हा केली लॉकडाऊनची घोषणा
- उद्या कदाचित मलाही ईडीची नोटीस येऊ शकते – रोहित पवार
- ‘मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’, पालिकेवर भगवा फडकविण्यासाठी सेनेचे गुजराती कार्ड
- महाराष्ट्रात आढळले नव्या कोरोना स्ट्रेनचे रुग्ण, मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे केली ‘ही’ मागणी
- शेतकरी – सरकारमधील चर्चा पुन्हा निष्फळ, 8 जानेवारीला पुढची बैठक
- आदर्श गाव ‘हिवरे बाजारात’ तब्बल 30 वर्षांनी ग्रामपंचायत निवडणूक
- सरपंचपदाच्या लिलावाच्या घटनेची गंभीर दखल, निवडणूक आयोगाचे चौकशीचे आदेश