लंडन : कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनमुळे आता कोरोनारुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. ब्रिटनमध्ये नवा व्हायरस आढळल्यानंतर संपूर्ण जगाची चिंता वाढली होती. ब्रिटनमध्ये अनेकांना या नव्या व्हायरसची लागण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पंतप्रधान बेरिस जॉन्सन यांनी लॉकडाउन लागू करण्याची घोषणा केली आहे.
कोरोनाच्या नव्या प्रकाराला रोखण्यासाठी हा लॉकडाउन लागू केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं असून याची सुरुवात शाळांपासून होणार आहे. बुधवारपासून सर्व शाळा बंद होतील अशी माहिती जॉन्सन यांनी दिली.
UK PM imposes harsh lockdown for England amid COVID-19 new variant
Read @ANI Story | https://t.co/dGp7XFkBzl pic.twitter.com/yIKiYGGCIZ
— ANI Digital (@ani_digital) January 4, 2021
मागच्या वर्षी जेव्हा या महामारीला सुरुवात झाली होती, तेव्हा संपूर्ण युनायटेड किंग्डममधील नागरिकांनी या व्हायरशी लढा देण्यात योगदान दिले आणि यात अजिबात शंका नाही, की या जुन्या व्हायरशी दिलेली झुंज यशस्वीही ठरताना दिसत होती. पण, आता या व्हायरसची एका नव्या प्रकाराची माहिती मिळाली आहे. या व्हायरसचा संसर्गाचा वेग हा अतिशय तणावपूर्ण आणि सतर्क करणारा आहे, असा इशारा जॉन्सन यांनी दिला आहे.
जवळपास 21 दिवसांसाठी ब्रिटनमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. या दरम्यान अत्यावश्यक कारणं, वैद्यकीय कारणं, जीवनावश्यक वस्तूंची खरेदी आणि कौटुंबिक हिंसेतून मदत मागण्यासाठीच्या कारणांनीच घराबाहेर पडण्याची मुभा नागरिकांना असेल.
Read Also :
- उद्या कदाचित मलाही ईडीची नोटीस येऊ शकते – रोहित पवार
- ‘मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’, पालिकेवर भगवा फडकविण्यासाठी सेनेचे गुजराती कार्ड
- महाराष्ट्रात आढळले नव्या कोरोना स्ट्रेनचे रुग्ण, मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे केली ‘ही’ मागणी
- शेतकरी – सरकारमधील चर्चा पुन्हा निष्फळ, 8 जानेवारीला पुढची बैठक
- आदर्श गाव ‘हिवरे बाजारात’ तब्बल 30 वर्षांनी ग्रामपंचायत निवडणूक
- सरपंचपदाच्या लिलावाच्या घटनेची गंभीर दखल, निवडणूक आयोगाचे चौकशीचे आदेश
- ‘आमच्यामुळेच मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद मिळाले हे लक्षात ठेवा, सेनेचा काँग्रेसला इशारा