मुंबई : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण आता त्यांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाला हरवल्यानंतर आता ते पुन्हा फिल्डवर हजर असण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार व्हायला लागल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अक्षरशः कामांचा धडाकाच लावला होता. पुण्यातील पहाटेची मेट्रो कामाची पाहणी, अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी घेतलेली भेट या सर्व दौऱ्यांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा अनेक लोकांशी संपर्क झाला आणि त्यातून त्यांना कोरोनाची लागण झाली.
जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोणाची लागण झाली तेव्हाच माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही कोरोनाची लागण झाली. मग फडणवीसांनी स्वतःचा उपचार सरकारी रुग्णालयात करण्यास सुरुवात केली आहे. आता अजित पवारांनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना रुग्णालयातून डिस्चार्ज कधी मिळणार याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.
तत्पूर्वी याआधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सामाजिक न्याय विकासमंत्री धनंजय मुंडे आमदार गोपीचंद पडळकर तसेच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली होती पण त्यांनी कोरोनाशी लढा देत त्यावर मात केली.
Read Also :
‘राज’ पिता – पुत्र टेनिस खेळताना फोटो व्हायरल…. https://t.co/PFBRv0rzUJ @RajThackeray @mnsadhikrut
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) November 2, 2020