IMPIMP

हे राष्ट्रीय स्मारक आहे , असे लपून छपून कार्यक्रम करु नका – फडणवीसांचा  टोला

मुंबई : . ‘बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम लपून छपून करण्याचं नेमकं कारण काय हे समजलेच नाही. हा कार्यक्रम करायचा असेल तर राजरोसपणे करा. हे राष्ट्रीय स्मारक आहे हे वैयक्तिक स्मारक नाही. त्यामुळे असे लपून छपून कार्यक्रम करु नका. हे योग्य नाही, यामुळेच सरकारचे हसं होतं, असा  टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रमाची माहिती मंत्र्यांनादेखील नव्हती याचे मला आश्चर्य वाटत आहे. अशा कार्यक्रमांमुळे सरकारचे हसे होतं, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावला. ‘एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उंची वाढवण्याचा निर्णय देखील आमच्या सरकारने घेतला होता. त्यानंतर आताच्या सरकारने तो निर्णय अमलात आणला, त्यातील सर्व अडचणी आम्ही आमच्या काळातच दूर केल्या आहेत. मात्र आता याचं काम वेगाने पूर्ण केले पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.