मुंबई : माझे आक्षेापार्ह फोटोज, व्हिडीओज् त्यांच्याकडे आहेत. माझे फोटो आणि व्हिडीओ धनंजय मुंडेंकडे असल्याने मी एवढे दिवस गप्प होते, असे कारण मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेने दिले आहे. एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्यावर झालेल्या आरोपांना उत्तर दिले आहे.
एवढ्या दिवस गप्प राहण्याचे कारण विचारले असता, महिलेने सांगितले की, मी तुझं आयुष्य घडवेल, तुझी स्वप्न पूर्ण करेल. मी तुझ्या पाठीशी आहे, मी तुझ्याशी लग्न करेल, अशी खोटी आश्वसनं देऊन धनंजय मुंडे यांनी माझा वापर केला. माझे फोटो आणि व्हिडीओ त्यांच्याकडे असल्याने मी एवढे दिवस गप्प होते.
कृष्णा हेगडे आणि मनिष धुरी यांनी केलेल्या आरोपांना देखील महिलेने उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की, कृष्णा हेगडे हे मला प्रताप सरनाईक यांच्या बर्थडे पार्टीत भेटले होते. ते स्वतः सर्वातप्रथम माझ्याशी बोलले. ते असे का बोलत आहेत मला माहिती नाहीत.
मनिष धुरी यांची कामानिमित्त भेट झाली होती. त्यानंतर ते मला रोज दारू पिऊन फोन करत असे. धनंजय मुंडे माझ्या बहिणीचे पती असल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी धुरींनी मुंडेंबद्दल अपशब्द वापरले होते. पण आता तेच धुरी मुंडेंच्या बाजूनं बोलत आहेत, असेही महिला म्हणाले.
Read Also :
- धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी राज्यभर आंदोलन, भाजप आक्रमक
- धनंजय मुंडेंविरोधात उच्च न्यायालयात याचिका, केली ‘ही’ मागणी
- … तर मीच मागे हटते, आपल्यावरील आरोपांनंतर रेणू शर्मांचे ट्विट
- ‘… त्यापेक्षा मुख्यमंत्र्यांना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी’
- टेस्ला आपला प्लांट महाराष्ट्रात उभारणार ? रोहित पवारांनी दिले संकेत