मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपानंतर मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी काल थेट राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले. पवारांच्या भेटीनंतर विश्वास नांगरे पाटलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे सांगितले जाते. या बैठकीनंतर आता चर्चांना उधाण आले आहे.
भाजपकडून या भेटीवर टीका करण्यात आली आहे. तसेच, विश्वास नांगरे पाटील यांची त्वरित हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
पोलिस अधिकाऱ्यांनी शरद पवारांसोबत चर्चा करायला ते राज्याचे गृहमंत्री आहेत की मुख्यमंत्री? राज्यात कोणतेही अधिकार पद नसलेल्या पवारांशी चर्चा करणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी मी कॅबिनेट सचिवांकडे करणार आहे. https://t.co/MRgK3g4E7g
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 14, 2021
पोलिस अधिकाऱ्यांनी शरद पवारांसोबत चर्चा करायला ते राज्याचे गृहमंत्री आहेत की मुख्यमंत्री? असा सवाल करतानाच भातखळखर यांनी राज्यात कोणतेही अधिकार पद नसलेल्या पवारांशी चर्चा करणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी मी कॅबिनेट सचिवांकडे करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पाठी मागून सूत्र हलवण्यापेक्षा घरी बसलेल्या मुख्यमंत्र्यांना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी… https://t.co/MRgK3g4E7g
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 14, 2021
तसेच, पाठीमागून सूत्र हलवण्यापेक्षा घरी बसलेल्या मुख्यमंत्र्यांना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी, असा टोला देखील त्यांनी लगावला.
Read Also :
- टेस्ला आपला प्लांट महाराष्ट्रात उभारणार ? रोहित पवारांनी दिले संकेत
- धनंजय मुंडेंवरील आरोपामागे राजकीय षडयंत्र – जयंत पाटील
- एक तरफ घरवाली आणि एक तरफ बाहरवाली! मुंडेंची त्वरित हकालपट्टी करा – तृप्ती देसाई
- ‘हा तर केस झाकायचा अजेंडा’, त्या भेटीगाठींनंतर निलेश राणेंचा मोठा आरोप
- एकनाथ खडसे आज ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार!