मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला होता. यानंतर विरोधकांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र विरोधी पक्ष असलेल्या भाजप आणि मनसेच्या नेत्यांकडून त्या महिलेविरोधात हनीट्रॅप आणि फसवणुकीच्या स्वरूपाचे आरोप करण्यात आल्यानंतर आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसची कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या बैठकीनंतर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुडेंवरील आरोपांमागे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे.
धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिलेवरच भाजपच्या एका माजी आमदाराने, तसेच मनसेच्या नेत्याने ब्लॅकमेलिंगचा आरोप केला आहे. त्यामुळे लोकांच्या मनात हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार असल्याची शंका आहे. यामागे कोणीतरी असून, राजकीय षडयंत्र असल्याची आमची शंका असल्याचे, जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
पोलीस तपास करत असून, पोलिसांच्या चौकशीनंतर पक्ष योग्य तो निर्णय घेईल. राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. जाणीवपूर्वक कोणी काही करत असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता निश्चित त्याला उत्तर देईल, असा इशारा देखील त्यांनी दिला.
ही व्यक्तिगत केस असून, पोलीस तपास झाल्यावर जी बाजू दोषी असेल, त्याबाबत पोलीस योग्य तो निर्णय घेतील. पोलिसांनी योग्य ती तपासणी करावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.
Read Also :
- एक तरफ घरवाली आणि एक तरफ बाहरवाली! मुंडेंची त्वरित हकालपट्टी करा – तृप्ती देसाई
- ‘हा तर केस झाकायचा अजेंडा’, त्या भेटीगाठींनंतर निलेश राणेंचा मोठा आरोप
- एकनाथ खडसे आज ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार!
- ‘या’ तारखेला मांडला जाणार देशाचा अर्थसंकल्प
- … तर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्याशिवाय पर्याय नाही – प्रकाश आंबेडकर