औरंगाबाद : राज्यात आता शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची निवडणुक जाहीर करण्यात आली आहे. नाशिक, औरंगाबाद, नागपुर, कोकण शिक्षक या मतदारसंघात ह्या निवडणुकांसाठी मतदान येत्या 30 जानेवारीला होणार आहे. तर 2 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. तर 4 फेब्रुवारीला मतदानाची सर्व प्रक्रिया पुर्ण होणार आहे. यातच आता औरंगाबाद विभागात भाजपने आपला उमेदवार जाहीर केला आहे.
“उपटसुंभ लोकांना उत्तर द्यायला मी बांधील नाही,” अजित पवारांचा पडळकरांवर हल्लाबोल
औरंगाबाद विभागाकडून भाजपने किरण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर राष्ट्रवादीकडून विक्रम काळे यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे. या विभागात प्रथमच प्रहार पक्षाकडून संजय तायडे पाटील लढणार अशी घोषणा बच्चू कडू यांनी मागेच केली आहे. तर मराठवाडा शिक्षक मतदार संघ निवडणुक, शिक्षक क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज पाटील, मराठवाडा शिक्षक मतदार संघासाठी अर्ज भरणार आहेत.
“संजय राऊतांची ती भविष्यवाणी खोटी ठरणार”; मंत्री दिपक केसरकर
30 जानेवारीला ज्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये पाचही विभागात आम्ही उमेदवार देणार आहेत. त्यात मराठवाड्यात संजय तायडे, अमरावती किरण चौधरी, नरेश शंकर कोंडा हे कोकण विभागासाठी उमेदवार आहेत. तसेच अतुल रायकर हे नागपुर तर सुभाष जंगले हे नाशिक विभागातून उभे करणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे.
Read also
- “राज्याची तिजोरी लुटण्याचं काम सध्या इडी सरकारकडून सुरूय”
- “सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात तारीख पे तारीख”, अजित पवारांचं राजकीय घडामोडींवर भाष्य
- राज्यातील घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रणनीती ठरणार.! अजित पवारांनी दिले संकेत
- “आम्हाला तोंड उघडायला लावू नका, अन्यथा…;” रवी राणांना शिवसेनेचा इशारा
- “आम्हाला तोंड उघडायला लावू नका, अन्यथा…;” रवी राणांना शिवसेनेचा इशारा