पुणे : बारामतीचे चुलते, पुतणे चोरटे आहेत. दिवसा दरोडे टाकतात. शरद पवार यांनी 50 वर्ष राज्य केलं. पण विकास केला नाही. काका-पुतण्याची एकच टोळी राज्यात उपलब्ध आहे. दुसरी टोळीत उपलब्ध नाही. अशी टिका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे. त्यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांचा खुरपुस समाचार घेतला आहे.
“खासदारकीसाठी भाजपने ऑफर दिली तरी भाजपात जाणार नाही”, ठाकरे गटाचे खासदार निंबाळकरांचं विधान
गोपीचंद पडळकर यांच्या आरोपांवर विचारले असता अजित पवार भडकले. ते म्हणाले की, अशा उपटसुंभ माणसाच्या प्रश्नांना उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही. त्याच्यासंबंधित कुठलाही प्रश्न असेल तर त्यावर उत्तर द्यायला मी रिकामा नाही. त्याचा डिपॉजिट जप्त करून त्याला घरी पाठवून दिलं आहे. असा टोला अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांना लगावला आहे.
अमृता ताईंचा ऊर्फीला एक मोलाचा सल्ला..! म्हणाल्या,”ऊर्फीला मला इतकं सांगायचं आहे की…,”
बरोबरी ठरवायचा अधिकार त्यांना कुणी दिला नाही. जनतेनी त्यांना जास्तीची मतं दिल्याने त्या मस्तीत त्यांनी जाऊ नये. त्या जनतेने अनेक लोकांना घरी बसवलं आहे. इंदिरा गांधींचा देखील पराभव झाला आहे. त्यामुळे अजित पवार किस झाड की पत्ती है, असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांना प्रत्यु्त्तर दिलं आहे.
Read also
- “संजय राऊतांची ती भविष्यवाणी खोटी ठरणार”; मंत्री दिपक केसरकर
- “ऊर्फी जावेदला दिला त्रास, चित्रा अशी कशी तु गं सास..”; ऊर्फीने चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं
- “धनुष्यबाण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच मिळणार, ठाकरेंसोबत फक्त तीन लोकं शिल्लक राहणार”
- “शिवसेना फोडण्याचं शरद पवारांचं नाही तर भाजपचंच जुनं स्वप्न होतं”
- सत्तासंघर्षाची सुनावणी ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी..! सर्व काही प्रेमानं होईल; संजय राऊत