नवी दिल्ली : ठाकरे आणि शिंदे यांच्या याचिकांवरील सुनावणी आणखी लांबणीवर ढकलली आहे. आता येत्या पुढील सुनावणी ही १४ फेब्रुवारी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यातच १४ फेब्रुवारीपासून सर्व काही प्रेमानं होणार अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे त्या सुनावणीत नेमकी काय होईल, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर धनुष्यबाण हे एकनाथ शिंदेंनाच मिळेल, असं आमदार रवी राणा यांनी सांगितलं आहे.
“नसीब बदले या न बदले…वक्त जरूर बदलता है..!” राऊतांचं ते ट्विट चर्चेत
शिवसेनेच्या बंडखोर 16 आमदारांवरील अपात्रतेविषयी पुढील सुनावणी 14 फेब्रुवारी होणार आहे. तर आज सांयकाळी निवडणुक आयोग धनुष्यबाणांसदर्भात सुनावणी करणार आहे. यातच धनुष्यबाण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच मिळणार आहे. तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत फक्त तीनच माणसं शिल्लक राहणार आहेत.यात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब. अशी खोचक टिप्पणी रवी राणा यांनी दिली आहे.
ठाकरे गटाच्या तिसऱ्या आमदाराच्या घरी एसीबी पोहचले..! साळवी, नाईक अन् आता नितीन देशमुख
आज सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी वेळी खासदार संजय राऊत, अनिल देसाई, आणि अनिल परब हे देखील उपस्थित होते. तर शिंदे गटातील वकिलांनाकडून निहार ठाकरे उपस्थित होते. तसेच हे प्रकरण आता पाच न्यायाधीश खंडपीठाकडून ७ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार का? यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.
नेतेच असं वागणार असतील तर काय आदर्श घेणार? रोहित पवारांचा राजकीय नेत्यांना सवाल
१४ फेब्रुवारीपासून घटनापीठ सलग सुनावणी घेणार आहेत. ती आमच्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. मुख्य न्यायाधीशांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्रातील हे प्रकरण आम्ही ऐकू. असं संजय राऊतांनी म्हटलं. तसेच कोर्टात कपिल सिब्बल यांनी १४ फेब्रुवारी हे वॅलिटाईन डे आहे. शुभ दिवस आहे. त्यावर राऊत म्हणाले की, त्यादिवसापासून सर्व काही प्रेमानं होणार. असं राऊत म्हणाले.
Read also
- “शिवसेना फोडण्याचं शरद पवारांचं नाही तर भाजपचंच जुनं स्वप्न होतं”
- सत्तासंघर्षाची सुनावणी ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी..! सर्व काही प्रेमानं होईल; संजय राऊत
- “खासदारकीसाठी भाजपने ऑफर दिली तरी भाजपात जाणार नाही”, ठाकरे गटाचे खासदार निंबाळकरांचं विधान
- अमृता ताईंचा ऊर्फीला एक मोलाचा सल्ला..! म्हणाल्या,”ऊर्फीला मला इतकं सांगायचं आहे की…,”
- “तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 40 आमदार अपात्र ठरतील”; कोर्टात आज ठाकरे-शिंदेंचा फैसला