मुंबई : राज्यात आज शिंदे आणि ठाकरे यांनी दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यापासून हे प्रकरण न्यायालयात सुनावणीसाठी ठेवण्यात आले आहे. परंतु यावर अद्यापही कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यातच आजची सुनावणी दोन्ही बाजूंच्या नेत्यांसाठी अतिशय महत्वाची असून ठाकरे गटातील आमदार खासदार, सध्या दिल्लीला गेले आहेत. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष्य लागून राहिलं आहे.
मोठी बातमी..! “सुरतवरून गुवाहाटीला जाणाऱ्या ठाकरे गटाच्या आमदाराला एसीबीची नोटीस”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाळी केल्यानंतर ठाकरे गटातील नेत्यांनी 16 आमदारांवर निलंबणाची कारवाई करण्यात यावी, यासाठी याचिका सादर केली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला तर 16 आमदारांसोबत 40 पैकी 40 आमदार निलंबित ठरतील अन् सरकार कोसळेल असा अंदाज प्रसिद घटनातज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी मांडला आहे. तसेच मागील काही महिन्यापासून राज्य सरकारचं जे काही कामकाज झालं, ते सर्व घटनाबाह्य ठरेल अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.
शिवसेना कार्यालय माझ्या वडिलांच्या नावावर, शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ठोकला दावा
सध्या सर्वोच्च न्यायालयात पाच याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. शिवसेना नेमकी कुणाची, 16 आमदारांच्या निलंबणाची याचिका, विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्षांवरील अविश्वास ठराव, आणि निवडणुक चिन्ह याबाबत याचिका दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी सादर केल्या आहेत. त्यामुळे यावर काय निकाल लागणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
“चित्रा वाघ मेरी सासू, आय. लव्ह. यु. चित्रा वाघ”; ऊर्फीने चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं
दरम्यान, सध्या हे प्रकरण पाच न्यायधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आले आहे. मागील सुनावणीच्या वेळी ठाकरे गटातील वकिलांनी हे प्रकरण सात न्यायधीशांच्या खंडपीठाकडे सुपुर्त करण्यात यावे अशी मागणी केली होती. जर हे प्रकरण सात न्यायधीशांच्या खंडपीठाकडे देण्यात आले तर हे प्रकरण आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
Read also
- “नसीब बदले या न बदले…वक्त जरूर बदलता है..!” राऊतांचं ते ट्विट चर्चेत
- ठाकरे गटाच्या तिसऱ्या आमदाराच्या घरी एसीबी पोहचले..! साळवी, नाईक अन् आता नितीन देशमुख
- नेतेच असं वागणार असतील तर काय आदर्श घेणार? रोहित पवारांचा राजकीय नेत्यांना सवाल
- “ऊर्फीनंतर आता चित्रा वाघ यांनी गौतमी पाटीलकडे मोर्चा वळविला”, म्हणाल्या, तिचे व्हिडीओ..,
- इंदोरीकर महाराजांच्या सासुबाई भाजपात, राधाकृष्णा विखे पाटील अन् थोरातांमध्ये जोरदार दावा