अहमदनगर : मागील काही महिन्यापासून राजकीय पक्षातील नेत्याचं पक्ष प्रवेश वाढलेलं दिसून येत आहे. यातच आता प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या सासू शशिकला शिवाजी पवार यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्या नगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील निळवंडे गावच्या सरपंच आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शशिकला पवार अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या.
“कोणी आमदार, खासदार गेले म्हणजे शिवसेना खच्ची झाली हा त्यांचा भ्रम”
राज्याचे महसुलमंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती समोर येत आहे. संगमनेर तालुक्यातील निळवंडे गावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत.
“चाकणकर ताई..! तुमचा पेपर सुप्रियाताईंच्या दरबारी सोडवा..;” चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर
सुरूवातीला काॅंग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी निळवंडे ग्रामपंचायतीत आमची सत्ता आल्याचा दावा केला होता. शशिकला पवार या किर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या सासूबाई असून गावच्या विकासासाठी आपण निवडणुक लढवल्याचे त्यांनी स्पष्ट करत दोन्ही नेत्यांशी सलोख्याचे संबंध असल्याचं म्हटले होते.
Read also
- मोठी बातमी..! “सुरतवरून गुवाहाटीला जाणाऱ्या ठाकरे गटाच्या आमदाराला एसीबीची नोटीस”
- शिवसेना कार्यालय माझ्या वडिलांच्या नावावर, शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ठोकला दावा
- “चित्रा वाघ मेरी सासू, आय. लव्ह. यु. चित्रा वाघ”; ऊर्फीने चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं
- “बिहारप्रमाणे ओबीसी समाजाची जनगणना करा”, छगन भुजबळांची पत्राद्वारे मागणी
- “आमच्या मागे चामुंडा मातेचा आशीर्वाद, 40 लोकं जमा करणं सोपं नव्हतं”, भाजप नेत्यांच वक्तव्य चर्चेत