मुंबई : मागील काही दिवसापासून ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार राजकीय संघर्ष बघायला मिळत आहेत. यातच आता ठाकरे गटातील आमदार नितीन देशमुख यांनी एसीबीने नोटीस पाठवल्याची माहिती समोर येत आहेत. त्यांना 17 जानेवारीला एसीबी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
“चाकणकर ताई..! तुमचा पेपर सुप्रियाताईंच्या दरबारी सोडवा..;” चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर
एसीबीने नितीश देशमुख यांना मालत्तेबाबत जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे आदेश नोटीसमधून देण्यात आले आहेत. त्यासाठी त्यांना 17 जानेवारीला चौकशीसाठी बोलवण्यात आले आहेत. नोटीसच्या बाबतीत वारंवार अशा चुकीच्या पद्धतीने कामकाज चालवून चुकीच्या पद्धतीने कुणाला कसा त्रास द्यायचा हेच या सरकारचं चाललं आहे. काही दिवसापुर्वी माझ्यावर गुन्हा दाखल झाला. नागपुरच्या अधिवेशनावेळी माझ्यावर कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल झाला. आता एसीबीची नोटीस आली असल्याचं नितीन देशमुख यांनी म्हटलं आहे.
“उद्या ठाकरे-शिंदेंचा फैसला होणार, जर असं झालं तर प्रकरण आणखी लांबणीवर”?
नोटीससंदर्भात मला17 तारखेला अमरावतीला बोलावलं आहे. मी 17 तारखेला अमरावतीला एसीबीच्या ऑफिसला जाणार आहे. माझं काय म्हणणं आहे ते मी त्याठिकाणी मांडणार आहे. तसेच एसबीची नोटीस देण्यात आली. त्याविषयी तक्रार नेमकी कुणाची आहे. त्यावर एसीबीचं काय म्हणणं आहे, आमच्याकडे कोणती मालमत्ता आहे. याबाबत कोणतंही स्पष्टीकर नाही. असंही त्यांनी म्हटलं आहे.
“मला सध्या राजकारणात संधी न देणाऱ्यालाच विचारा”; पंकजा मुंडेंचा रोख नेमका कुणाकडे?
दरम्यान, महाराष्ट्रात जेव्हा सत्तांतरण होत होतं. त्यावेळी नितीन देशमुख हे सुरतवरून गुवाहाटीला न जाता त्यांनी ठाकरे गटात सामील होण्यासाठी त्यांनी मुंबई गाठलं होतं. त्यावेळी ते चर्चेत होते.
Read also
- शिवसेना कार्यालय माझ्या वडिलांच्या नावावर, शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ठोकला दावा
- “चित्रा वाघ मेरी सासू, आय. लव्ह. यु. चित्रा वाघ”; ऊर्फीने चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं
- “बिहारप्रमाणे ओबीसी समाजाची जनगणना करा”, छगन भुजबळांची पत्राद्वारे मागणी
- “आमच्या मागे चामुंडा मातेचा आशीर्वाद, 40 लोकं जमा करणं सोपं नव्हतं”, भाजप नेत्यांच वक्तव्य चर्चेत
- “कोणी आमदार, खासदार गेले म्हणजे शिवसेना खच्ची झाली हा त्यांचा भ्रम”