मुंबई : सर्वोच्च न्यायालयात सध्या ठाकरे आणि शिंदे यांचं प्रकरण सुनावणीसाठी आहे. मागील पाच ते सहा महिन्यापासून या प्रकरणावर फक्त तारीख पे तारिख दिली जात आहे. परंतु अद्याप यावर कोणताही निर्णय घेतला गेला नाही. यातच आज या प्रकरणावर सुनावणी होत असून हे प्रकरण आता 7 न्यायमूर्तीच्या खंडपीठाकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे उद्या काय सुनावणी होईल? त्याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागून राहिलं आहे. त्याआधी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केला आहे.
शिवसेना कार्यालय माझ्या वडिलांच्या नावावर, शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ठोकला दावा
मनात नेहमी जिंकण्याची आशा बाळगली पाहिजे. नशीब बदलेल या ना बदलेल पण वेळ ही बदलतेच. असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. त्यामधून संजय राऊत यांना काय सुचवायचं आहे. ते आपल्या सर्वांना ठाऊकच आहे.
“चित्रा वाघ मेरी सासू, आय. लव्ह. यु. चित्रा वाघ”; ऊर्फीने चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं
उद्धव ठाकरे गटाने हे प्रकरण 7 न्यायमुर्तींच्या बेंचकडे जावे अशी मागणी केली आहे. या अगोदर ते चार न्यायमुर्तींच्या खंडपीठाकडे सध्या सुनावणीसाठी आहे. त्यामुळे जर हे प्रकरण आता 7 न्यायमूर्तींच्या बेंचकडे गेल्यास या प्रकरणाचा निकाल आणखी लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
“बिहारप्रमाणे ओबीसी समाजाची जनगणना करा”, छगन भुजबळांची पत्राद्वारे मागणी
उद्या मंगळवारी शिंदे -ठाकरे यांनी सादर केलेल्या याचिकांवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्याच्या सुनावणीकडे सगळ्याचं लक्ष्य लागून राहिलं आहे. याचा निकाल शिंदेंच्या विरोधात लागला तर सरकार देखील कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातच शिंदे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.
Good morning..
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/C8TWz86FcW— Sanjay Raut (@rautsanjay61) January 10, 2023
Read also
- ठाकरे गटाच्या तिसऱ्या आमदाराच्या घरी एसीबी पोहचले..! साळवी, नाईक अन् आता नितीन देशमुख
- नेतेच असं वागणार असतील तर काय आदर्श घेणार? रोहित पवारांचा राजकीय नेत्यांना सवाल
- “ऊर्फीनंतर आता चित्रा वाघ यांनी गौतमी पाटीलकडे मोर्चा वळविला”, म्हणाल्या, तिचे व्हिडीओ..,
- इंदोरीकर महाराजांच्या सासुबाई भाजपात, राधाकृष्णा विखे पाटील अन् थोरातांमध्ये जोरदार दावा
- मोठी बातमी..! “सुरतवरून गुवाहाटीला जाणाऱ्या ठाकरे गटाच्या आमदाराला एसीबीची नोटीस”