मुंबई : अभिनेत्री ऊर्फी जावेदच्या कपड्यावरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ मागील काही दिवसापासून आक्रमक झाल्या आहेत. ऊर्फी जावेदचा हा नंगानाच आम्ही खपवून घेणार नाही. असं म्हणत चित्रा वाघ यांनी ऊर्फी जावदेविरोधात रणशिंग फुकलं आहे. त्यावर ऊर्फीने देखील चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यातच आज ऊर्फी जावेदने आज पु्न्हा एक ट्विट करत चित्रा वाघ यांना डिवचलं आहे.
“तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 40 आमदार अपात्र ठरतील”; कोर्टात आज ठाकरे-शिंदेंचा फैसला
ऊर्फी जावेदने आपल्या ट्विटवर एक फोटो ट्विट केला आहे. त्यावर लेकीन अभी भी बहोत सुधार बाकी है, असं म्हणत स्वारी, चित्रा वाघ. आय लव्ह यु. असं म्हणत ऊर्फीने चित्रा वाघ यांना डिवचलं आहे. तर दुसऱ्या ट्विटमध्ये मेरी डीपी है डासू, चित्रा वाघ मेरी सासू. तसेच आज आणखी ऊर्फी जावेदला दिला त्रास, चित्रा अशी कशी तु ग सास असं म्हणत चित्रा वाघ यांना डिवचण्याचा प्रयत्न ऊर्फीने केला आहे. त्यामुळे यावर आता चित्रा वाघ काय प्रत्यु्त्तर देणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
“नसीब बदले या न बदले…वक्त जरूर बदलता है..!” राऊतांचं ते ट्विट चर्चेत
ऊर्फीच्या वादात आता चित्रा वाघ यांनी महिला आयोगाला देखील ओढलं आहे.त्यानंतर महिला आयोगाने चित्रा वाघ यांना नोटीस पाठवत आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितली होती. त्यावर चित्रा वाघ यांनी उलट महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर टिका केली.
Read also
- “धनुष्यबाण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच मिळणार, ठाकरेंसोबत फक्त तीन लोकं शिल्लक राहणार”
- “शिवसेना फोडण्याचं शरद पवारांचं नाही तर भाजपचंच जुनं स्वप्न होतं”
- सत्तासंघर्षाची सुनावणी ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी..! सर्व काही प्रेमानं होईल; संजय राऊत
- “खासदारकीसाठी भाजपने ऑफर दिली तरी भाजपात जाणार नाही”, ठाकरे गटाचे खासदार निंबाळकरांचं विधान
- अमृता ताईंचा ऊर्फीला एक मोलाचा सल्ला..! म्हणाल्या,”ऊर्फीला मला इतकं सांगायचं आहे की…,”