मुंबई : शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री अनिल परब यांच्यावर इडीने हातोडा टाकला आहे. साई रिसोर्टशी संबंधित जवळपास 10 कोटी 20 लाखांची संपत्ती अनिल परब यांची इडीने जप्त केली आहे. त्यामुळे अनिल परब यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. तर भाजप नेते किरीट सोमय्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं आहे. त्यावर आता अनिल परब यांनी आपली पहिली प्रतिक्रिया टिव्ही9ला दिली आहे.
बावनकुळेंकडून ‘औरंगजेबजी’ असा उल्लेख, टिलल्या आमदार पुतळा जाळणार का ?
याप्रकरणानंतर मी अब्रुनुकसानीचा दावा केलेला आहे. ज्यावेळेला माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही हे सिद्ध होईल. त्यावेळेला सगळ्यांनाच त्याची किमंत द्यावी लागेल. असा इशारा अनिल परब यांनी दिला आहे. तसेच याबाबतील सगळे खुलासे पोलिसांकडे झालेले आहेत. तसेच इडी आणि आयटी देखील याबाबतीत सर्व खुलासे झाले आहे. वर्ष दोन वर्ष या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आता ज्यांनी जी संपत्ती जप्त केली आहे. ती कुठल्या कायद्याने आणि कुठल्या आधाराने त्याचा सर्व विचार संपत्तीचे मालक सदानंद मोरे करतील. असंही त्यांनी म्हटलं आहे.
मोठी बातमी..! अनिल परबांवर इडीची मोठी कारवाई, तब्बल 10 कोटी 20 लाखांची संपत्ती जप्त
साई रिसोर्टशी संबंधित अनिल परब यांच्यावर मनी लॉण्ड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. यासंदर्भात त्यांची मॅरेथान चौकशी झाली होती. आज इडीने अनिल परब यांच्यावर कारवाई करत जवळपास 10 कोटी 20 लाखांची चौकशी जप्त केली आहे. त्यामुळे अनिल परब यांच्यासोबत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
“आव्हाडांचा मुंब्रारक्षक उल्लेख करत नितेश राणेंचं आव्हाडांना पत्र”, म्हणाले…
अलिकडेच भाजप नेते किरीट सोमय्यांनी नवीन वर्ष सुरू होण्याच्या अगोदर पाच नेत्यांना इशारा दिला होता. त्यात अनिल परब यांचा साई रिसोर्ट देखील निशाण्यावर होता. तसेच मागील काही वर्षापासून किरीट सोमय्या हे सातत्याने यासंबंधित चौकशी करण्याची मागणी करीत होते.
Read also
- समस्या कोणतीही असो, उत्तर मात्र एकच देवेंद्र फडणवीस, शुद्ध हेतू आणि जनतेचा वसा..!
- “टिल्ल्या लोकांना हे सांगण्याची गरज नाही”; एका वाक्यात अजित पवारांनी राणेंची बोलती केली बंद
- “एकतर मी आत्महत्या करेन किंवा….” चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर उर्फीची पोस्ट व्हायरल
- “आदल्या रात्री बत्ती गुल, दुसऱ्या दिवशी थेट फडणवीसांनी निर्णयाच घेतला”
- “मी कुठं म्हणालो की, शरद पवारांना जाणता राजा म्हणा म्हणून..”, अजित पवार