मुंबई : माझ्या विचाराची आणि आकलनाची जी भूमिका होती, ती विधानसभेत मांडली आहे. त्यामुळे या विधानावर ठाम असून ज्या आमदार, मंत्र्यांनी महापुरूषांबाबत बेताल वक्तव्य केलीत, त्यांना आंदोनल करणारे विचारणार का ? असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर कधीच नव्हते, असं म्हटल्यानंतर भाजपने अजित पवारांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत राजीनामा देण्याची मागणी केली होती. त्यावर आज अजित पवार यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.
“माझ्या विधानावर ठाम, अगोदर बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना विचारा”; अजित पवार
माझ्याविरोधात मागील काही दिवसापासून जे आंदोलन सुरू आहे. त्यासाठी आंदोलन कर्त्यांचंच मला फोन आलेत. की असं असं आंदोलन तुमच्याविरोधात करण्याचं ठरवलं आहे, अन् माझ्या राजीनाम्याची मागणी करण्यास सांगितलं. असं अजित पवार म्हणाले, तसेच मला विरोधी पक्षनेते पद हे विधानमंडळातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी दिलं आहे. त्यामुळे माझा राजीनामा मागण्याचा भाजपला कोणताही अधिकार नाही. असंही अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं.
“फडणवीसांकडून जी 20 ची तुलना ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानासोबत”; राज्यात आणखी एक नवा वाद
तसेच शरद पवार यांना जानता राजा म्हणतात. त्यावर प्रश्न विचारले असता. त्यावर ते बोलले की, मी कुठं सांगितलं की माझ्या काकाला जाणता राजा म्हणा म्हणून असं म्हणतात भर पत्रकार परिषदेत हास्यकल्लोळ झाला होता.
“तर दिपक केसरकरांनी 2024 मध्ये तुरूंगात जाण्याची तयारी ठेवावी”
संभाजी महाराज यांचा माझ्या विधानातून कोणताही अपमान झाला नाही. याउलट भाजपच्या आमदारांनी, राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज, आणि इतर महापुरूषांचा वारंवार अपमान केला आहे. त्यामुळे माझे विचार मी मांडले आहेत. माझ्याविरोधात जे आंदोलन करत आहेत. त्यांनी अगोदर बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना विचारावं, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Read also
- बावनकुळेंकडून ‘औरंगजेबजी’ असा उल्लेख, टिलल्या आमदार पुतळा जाळणार का ?
- मोठी बातमी..! अनिल परबांवर इडीची मोठी कारवाई, तब्बल 10 कोटी 20 लाखांची संपत्ती जप्त
- “आव्हाडांचा मुंब्रारक्षक उल्लेख करत नितेश राणेंचं आव्हाडांना पत्र”, म्हणाले…
- “गाडीचा चक्काचुर, डोक्यावर गमजा, अन् अंगावर शाल, धंनजय मुंडे मुंबईकडे रवाना?”
- मै झुकेगा नहीं साला..! फडणवीस, शहा, अन् केसरकारांना टॅग करून राऊतांचं आवाहन