परळी : राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. काल रात्री उशिरा परळीकडे जाताना हा अपघात झाला आहे. या अपघात धनंजय मुंडे यांच्या छातीला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना पुढील उपचारासाठी मंबईला हलवण्यात येणार आहे. तसेच त्यांना मुंबई येथील ब्रिच कॅंडी रूग्णालयात घेऊन जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
“धनंजय मुंडे यांच्या गाडीचा अपघात, पुढील उपचारासाठी मुंबईत हलवणार “
काल दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून धनंजय मुंडे परळीकडे जात होते. याच दरम्यान परळी शहरात वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रात्री 12.30 च्या सुमारास अपघात झाला आहे. या अपघात धनंजय मुंडे यांच्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला घेण्यास सांगितलं आहे.
“मंत्रिमंडळाचा विस्तार होणे अशक्य, हे सरकार पडणार म्हणजे पडणारच”
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या ज्या गाडीचा अपघात झाला होता. त्याचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. या अपघात मुंडे यांच्या गाडीचा चक्काचुर झाला आहे. त्यामुळे यात गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच त्यांना रूग्णलायतील एक फोटो देखील व्हायरल झाला असून डोक्यावर गमजा अन् अंगाभोवती शाल अशा जखमी अवस्थेत धनंजय मुंडे यांचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.
“एक थाली के चट्टे बट्टे, खोके अन् दलबदलू मंडळींची राजधानी, सिल्लोड”, सेनेने डिवचलं
धनंजय मुंडे यांच्या गाडीचा अपघात झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता परसली आहे. त्यावरून धनंजय मुंडे यांची सध्या प्रकृती ठिक असून काळजी करण्यासारखे काही नाही. असं म्हणत कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका, असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. तसेच या अपघाताची माहिती त्यांनी ट्विट करूनही सांगितली आहे.
Read also
- मै झुकेगा नहीं साला..! फडणवीस, शहा, अन् केसरकारांना टॅग करून राऊतांचं आवाहन
- “माझ्या विधानावर ठाम, अगोदर बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना विचारा”; अजित पवार
- “फडणवीसांकडून जी 20 ची तुलना ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानासोबत”; राज्यात आणखी एक नवा वाद
- “तर दिपक केसरकरांनी 2024 मध्ये तुरूंगात जाण्याची तयारी ठेवावी”
- “2024 ला 200 पेक्षा जास्त विधानसभेच्या जागा निवडून येतील”, चंद्रशेखर बावनकुळे