औरंगाबाद : राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आयोजित केलेल्या सिल्लोड येथील कृषी महोत्सवाला सुरूवात झाली आहे. विविध कार्यक्रमांची मेजवाणी असलेल्या या कार्यक्रमाला अनेक लोकांनी हजेरी लावली. यातच भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावर आपली खोचक टोला हाणला आहे.
जे.पी. नड्डा नंतर लगचेच योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर, चर्चांना उधान
काल झालेल्या या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री भागवत कराड, रावसाहेब दानवे, खासदार इम्तियाज जलील, अतुल सावे, संदिपान भुमरे यांनी अब्दुल सत्तार यांच्या या कार्यक्रमाला हजेरी लावली. या भेटीचा फोटो ट्विट करत अंबादास दानवे यांनी यावर प्रखरशब्दात टिका केली आहे. एक थाली के चट्टे बट्टे असं म्हणत. स्थळ खोके आणि दलबदलू मंडळींची राजधानी, सिल्लोड, तसेच भाजपाई मंडळींसाठी खास, असा कॅप्शन दिला आहे.
“भिडे वाडा मोठे स्मारक व्हावा ही भूमिका, मोदींकडूनंही त्याला दुजोरा” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सिल्लोड महोत्सव 2023 अंतर्गत सांस्कृतिक महोत्सवात साबरी ब्रदर्स यांच्या कव्वालीचा कार्यक्रम सादर झाला. यासोबतच कॉमेडीयन सुनील ग्रोवर याने आपली कला सादर करून उपस्थितांना खळखळून हसविले. सायंकाळी फु बाई फु आणि स्वराज भक्तीसंगीत ऑर्केस्ट्रा चा कार्यक्रम होणार आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रसिद्ध संगीतकार, गायक अजय – अतुल यांचा कार्यक्रम सादर झाला.
दरम्यान, कृषी महोत्सवासाठी संबंधित अधिकाऱ्यांना पास विक्री करण्याचे आदेश कृषी मंत्रालयाकडून देण्यात आले होते. तसेच यासाठी कोट्यावधी रूपये जमा करण्याच्या सुचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. असा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांनी लावला होता. याचे पडसाद हिवाळी अधिवेशनात देखील बघायला मिळाले होते.
एक थाली के चट्टे बट्टे..
स्थळ… अर्थात #खोके आणि #दलबदलू मंडळींची राजधानी – #सिल्लोड!
भाजपाई मंडळींसाठी खास!!@DrBhagwatKarad @imtiaz_jaleel @SandipanBhumare @AbdulSattar_99 @save_atul @raosahebdanve pic.twitter.com/j6ftnFKsHE
— Ambadas Danve (@iambadasdanve) January 4, 2023
Read also
- “जिथे शिंदे गटाचा उमेदवार असेल तिथे अधिक ताकद लावू”; भाजपचा आघाडीला सुचक इशारा
- “देशात बेरोजगारीचा उच्चांक दर, मोदी सरकार सामाजिक तेढ वाढवण्यात व्यस्त”
- “अजितदादांचा संघ-भाजपला एवढा राग का येतो?”
- “भाजपचा आणि खोकेबाज गद्दारांचा येणारा काळ कसा असेल”?
- “जसं अथर्वशीर्ष विषय घेतला, तसा महापुरूषांचाही अभ्यासक्रम विद्यापीठात घ्या”; भुजबळांची शिंदेंसमोरच मागणी