औरंगाबाद : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपने 18 लोकसभेच्या निवडणुकांचा बार उडवला आहे. यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील 18 लोकसभा मतदार संघावर लक्ष्य केंद्रीत केलं आहे. यातच जे.पी. नड्डा यांची औरंगाबाद आणि चंद्रपुर येथे जाहीर सभा पार पडली. परंतु या सभेला लोकांनी पाठ फिरवली. त्यावरून काॅंग्रेसने त्यावर खोचक टोला हाणला आहे.
“नारायण राणेंनी स्वत:च्या भावाचा खून केला, त्याची नार्कोटेस्ट करा, सगळं उघड होईल”
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी औरंगाबाद येथील सभेचा व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये जे. पी. नड्डा यांच्या भाषणाच्या वेळी लोक सभेतून बाहेर जातांना दिसत आहेत. यावरून त्यांच्यावर टिका केली जात आहे. विशेष करून या सभेला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, रावसाहेब दानवे, आणि इतर भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
तुम्ही यावर गप्प का ? शिल्लेक राहिलेला बाळासाहेबाचा कडवट कार्यकर्ता हे कधीच मान्य करणार नाही
काॅंग्रेसने देखील यावर प्रखरशब्दात टिका केली आहे. भाजप आणि शिंदे गट एकवेळ जबरदस्तीने लोकांना अडवून सभेला दाखवतील पण जबरदस्तीने त्यांची मतं कशी घेतील. सभेला गर्दी जमेना, अन् जे आले ते थांबेना. अक्षर:श लोकांना जबरदस्तीने अडवून बसवलं जात आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच भाजपचा आणि खोकेबाज गद्दारांचा येणारा काळ कसा असेल हे स्पष्ट करायला हे चित्रचं पुरेसं असल्याचं म्हटलं आहे.
Read also
- “जसं अथर्वशीर्ष विषय घेतला, तसा महापुरूषांचाही अभ्यासक्रम विद्यापीठात घ्या”; भुजबळांची शिंदेंसमोरच मागणी
- जे.पी. नड्डा नंतर लगचेच योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर, चर्चांना उधान
- “भिडे वाडा मोठे स्मारक व्हावा ही भूमिका, मोदींकडूनंही त्याला दुजोरा” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- “तर त्याला नंगट मानसिकता म्हणू नये का ?” ऊर्फी जावेदवरून चित्रा वाघांची प्रश्नांची सरबत्ती, काय काय म्हणाल्या..?
- आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश