मुंबई : चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. नगरसेवक, महापौर ते विधिमंडळातील तडफदार प्रतिनिधी म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवणारे नेतृत्व काळाने हिरावून नेले आहे. अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाबद्दल शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
उर्फी जावेद चित्रा वाघ यांना नडली..! “आता सगळ्यांना एकत्र या म्हणत चित्रा वाघ यांचं आवाहन”
भाजपचे आमदार लक्ष्मण पांडूरंग जगताप यांचे दिर्घ आजारामुळे वयाच्या 59 व्या वर्षी मंगळवारी निधन झाले आहे. मागील काही वर्षापासून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांची ही झुंज आज अखेर ठरली असून त्यांचे आज सकाळीच बाणेर येथील ज्युपिटर रूग्णालयात निधन झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. त्यामुळे भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर लक्ष्मण जगताप यांचेही निधन झाल्याने संपुर्ण पिंपरी चिंचवड आणि पुणे शहारात शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे पत्नी अश्विनी, कन्या एश्वर्या, बंधू माजी नगरसेवक शंकर आणि विजुअण्णा जगताप असा मोठा परिवार आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल, यंदा तब्बल 6 राज्यात विधानसभेच्या निवडणुका
राज्यात अलिकडेच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीकरीता त्यांनी पक्षाचं कार्य श्रेष्ठ मानत व्हिल चेअर वरून येऊन मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतर राज्यात राज्यात झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत देखील लक्ष्मण जगताप हे रूग्णालयात उपचार सुरू असतांनाही ते रूग्णावाहिकेतून त्यांनी मुंबई गाठली होती. अन् मतदानाचा हक्क बजावला होता. त्यावेळी त्यांचं राज्यभरातून पक्षनिष्ठा पाळली असल्याने सगळ्या राजकीय नेत्यांनी कौतुक केलं होतं.
“देवेंद्र भाऊ हा देवी देवतांचा सन्मान आहे का?” केतकी चितेळ्याच्या पोस्टवरून सुषमा अंधारेंचा सवाल
शहराच्या राजकारणातील ढाण्या वाघ गेल्याची भावना गेल्याची भावना व्यक्त होत आहे. आमदार जगताप यांच्या निधनाने शहरावर शोककळा पसरली आहे. शहराच्या राजकारणात गेली ३५ वर्षे चार वेळी नगरसेवक, चार वेळा आमदार राहिलेले. आमदार जगताप यांच्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेत २०१७ मध्ये भाजपाची एकहाती सत्ता आली होती. आता जगताप यांच्यासारखा मोठा आधारस्तंभ निखळल्याने भाजपाला पोरकेपण आले आहे. आमदार जगताप हे गेली दोन वर्षांपासून आजारी होते. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांची तब्बेत खालवत गेली. मार्च च्या शेवटच्या आठवड्यात कुटुंबियांनी उपचारासाठी त्यांना अमेरिकेत नेले होते.
Read also
- “नारायण राणेंनी स्वत:च्या भावाचा खून केला, त्याची नार्कोटेस्ट करा, सगळं उघड होईल”
- तुम्ही यावर गप्प का ? शिल्लेक राहिलेला बाळासाहेबाचा कडवट कार्यकर्ता हे कधीच मान्य करणार नाही
- “नाहीतर उभा महाराष्ट्र तुमच्या सारख्या औरंग्याच्या अवलादीला गाडल्याशिवाय राहणार नाही”
- “कंगणा, केतकी, अन् अमृता फडणवीसांचा फोटो ट्विट करत अंधारेंचा चित्रा वाघ यांच्यावर निशाणा”
- आधी लढाई पक्षासाठी नंतर आजारपणाशी दोन हात…! जेव्हा लक्ष्मण जगताप रूग्णवाहिकेतून विधानसभेत दाखल झाले..