मुंबई : मागील दोन दिवसापासून राज्यातील राजकीय वातावरण विविध मुद्यांवरून चांगलचं गाजत आहेत. यातच अभिनेत्री केतकी चितळे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहीली आहे. त्यावरून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
“नितेश राणेंना सोडा, अगोदर नारायण राणेंची नार्कोटेस्ट करा”
सोमरस म्हणजे वाईन. सनातन धर्मात दारू आहे. आमचे देवही दारू पितात. काली मातेला तर दारुचे नैवेद्द असते. तसेच काही शंकाराच्या मंदिरातही दारू असते. असं म्हणत केतकी चितळे यांनी पोस्ट केली आहे. त्यावरून सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
“हिमंत असेल तर शनिवाड्याचे नाव होळकरवाडा करा अशी मागणी राज्य सरकारला करा”; पडळकरांना आव्हान
देवेंद्र भाऊ हा देवी देवतांचा सन्मान आहे का? की फक्त तुमच्या विरोधी पक्षातले लोक बोलतात. त्याचाच गहजब करावा. त्यावरच घसा ताणून सभागृहामध्ये आक्रस्ताळेपणा करावा असं काही तुमचं ठरलं आहे. असं म्हणत सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला आहे.
देवेंद्र भाऊ हा देवी देवतांचा सन्मान आहे का ?
की फक्त तुमच्या विरोधी पक्षातले लोक बोलतात त्याचाच गहजब करावा त्यावरच घसा ताणून सभागृहामध्ये आक्रस्ताळेपणा करावा असं काही तुमचं ठरलं आहे ? @Dev_Fadnavis @ShivsenaComms @ShivSena #पक्षपाती_राजकरण pic.twitter.com/VH1MAIerE6— SushmaTai Andhare (@andharesushama) January 2, 2023
Read also
- “राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या नेत्यांना औरंगजेब चावला का?” भाजपचा खोचक सवाल
- पिंपरी चिंचवडचा बाहुबली हरपला, भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन
- “यापुढे महाराष्ट्रात येताना बाळासाहेब ठाकरे हे नाव पाठ करून या”; सेनेचा नड्डांवर निशाणा
- “महाराज धर्मवीर असते तर काही लोकांनी कटकारस्थान करून औरंगजेबाच्या त्यांना स्वाधीन का केलं”
- अजित पवारांच्या वक्तव्यावर चित्रा वाघ संतापल्या, म्हणाल्या, “आता औरंगाबादचं संभाजीनगर नाही तर..”