मुंबई : संभाजी महाराज हे धर्मवीर कधीच नव्हते, असं वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. त्यावरून भाजपने रस्त्यावर उतरून आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे. जोपर्यंत अजित पवार माफी मागत नाही. तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. त्यातच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील असंच वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यावरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी कडक इशारा दिला आहे.
“राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या नेत्यांना औरंगजेब चावला का?” भाजपचा खोचक सवाल
राज्यातील सत्ता हातून निसल्यामुळे हे लोक बावचाळलेले आहेत. संभाजी महाराज यांचा अवमान करून पोट भरलं नाही. तर आता त्या औरंग्याचं गुणगान गाताहेत. जितेंद्र आव्हाड यांना कसला एवढा त्या औरंग्याच्या पुळका आला आहे. तात्काळ माफी मागा नाहीतर उभा महाराष्ट्र तुमच्या सारख्या औरंग्याच्या अवलादीला गाडल्याशिवाय राहणार नाही. असा थेट इशारा चित्रा वाघ यांनी दिला आहे.
पिंपरी चिंचवडचा बाहुबली हरपला, भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन
छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही पहिल्यापासूनच स्वराज्यरक्षक म्हणतो. ते संगमेश्वरला सरदेसाईंच्या वाड्यात होते. ही बातमी औरंगजेबाला कुणी दिली? इथेच तर खरा इतिहास आहे. छत्रपती संभाजी महाराजांना बहादुरगडावर नेण्यात आलं तिथे त्यांचे डोळे काढण्यात आले. त्याठिकाणी बाजूला विष्णूचं मंदिर आहे. औरंगजेब क्रुर आणि हिंदुद्वेष्टा असता तर त्याने विष्णुचं मंदिरही फोडलं असतं. तिथून छत्रपती संभाजीराजेंंना तुळापुरला नेण्यात आलं. त्यानंतर पुढे काय झालं तो इतिहास सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळेच मी म्हणतो आहे की, उगाच नको त्या इतिहासात जाऊ नका. इतिहास वाद वाढवतो. असं आव्हाडांनी म्हटलं आहे.
“यापुढे महाराष्ट्रात येताना बाळासाहेब ठाकरे हे नाव पाठ करून या”; सेनेचा नड्डांवर निशाणा
जितेंद्र आव्हाड यांनी काल पत्रकार परिषद घेऊन औरंगजेब क्रुर आणि हिंदुद्वेष्टा असता तर त्याने विष्णुचं मंदिरही फोडलं असतं. असं वक्तव्य केले आहे. त्यावरून राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या नेत्यांना औरंगजेब चावला, त्यांचे नेते म्हणतात छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते आणि त्यांचेच दुसरे नेते म्हणतात ज्याने छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं तो औरंगजेब क्रुर नव्हता. अशी टिका निलेश राणे यांनी केली आहे.
हातून सत्ता निसटल्यावर बावचळलेले लोक आहेत हे…#संभाजीमहाराज यांचा अवमान करून पोट भरलं नाही तर आता त्या औरंग्याचं गुणगान गाताहेत@Awhadspeaks कसला एवढा त्या औरंग्याच्या पुळका ?
तात्काळ माफी मागा नाहीतर उभा महाराष्ट्र तुमच्या सारख्या औरंग्याच्या अवलादीला गाडल्याशिवाय रहाणार नाही
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 2, 2023
Read also
- “कंगणा, केतकी, अन् अमृता फडणवीसांचा फोटो ट्विट करत अंधारेंचा चित्रा वाघ यांच्यावर निशाणा”
- आधी लढाई पक्षासाठी नंतर आजारपणाशी दोन हात…! जेव्हा लक्ष्मण जगताप रूग्णवाहिकेतून विधानसभेत दाखल झाले..
- उर्फी जावेद चित्रा वाघ यांना नडली..! “आता सगळ्यांना एकत्र या म्हणत चित्रा वाघ यांचं आवाहन”
- 2024 च्या लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल, यंदा तब्बल 6 राज्यात विधानसभेच्या निवडणुका
- “देवेंद्र भाऊ हा देवी देवतांचा सन्मान आहे का?” केतकी चितेळ्याच्या पोस्टवरून सुषमा अंधारेंचा सवाल