नवी दिल्ली : येत्या पुढील वर्षात लोकसभेची निवडणुक होऊ घातली आहे. त्याआधी म्हणजे यावर्षी देशातील तब्बल 9 राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहे. या निवडणुकांकडे लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल म्हणून पाहिलं जात आहे. त्यामुळे यावर्षात निवडणुकांचा चांगलाच धुमाकुळ रंगणार आहे.
अजित पवारांच्या वक्तव्यावर चित्रा वाघ संतापल्या, म्हणाल्या, “आता औरंगाबादचं संभाजीनगर नाही तर..”
कर्नाटक, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा, नागालॅंड, त्रिपूरा, मेघालय, जम्मू काश्मिर मध्ये 2023 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. कर्नाटक, मध्यप्रदेश आणि त्रिपुरामध्ये सध्या भाजपचे सरकार आहे. तर राजस्थान, छत्तीसगडमध्ये काॅंग्रेसची सत्ता आहे.
“नितेश राणेंना सोडा, अगोदर नारायण राणेंची नार्कोटेस्ट करा”
मेघालयामध्ये नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्ष सत्ते आहे. तर दक्षिणेकडील तेलंगाणामध्ये केसीआर यांच्या पक्षाची सत्ता आहे. त्यांनी नुकतचं त्यांच्या पक्षाचं नाव टिआरएसवरून बीआरएस केलं आहे. तर जम्मू काश्मीरमध्ये विभाजनानंतर निवडणुका व्हायच्या आहेत. त्यामुळे या निवडणुकांचा धुरळा चांगलाच बघायला मिळणार आहे.
“हिमंत असेल तर शनिवाड्याचे नाव होळकरवाडा करा अशी मागणी राज्य सरकारला करा”; पडळकरांना आव्हान
दरम्यान, मागच्या वर्षी गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा पार पडल्या. गुजरातमध्ये भाजपने तर हिमाचल प्रदेशमध्ये काॅंग्रेसची सत्ता स्थापन झाली. तर 2024 मध्ये महाराष्ट्रात देखील विधानसभेची निवडणुक होत आहे. त्यामुळे आगामी काही काळात निवडणुकांचा धुराळा उडणार आहे.
Read also
- “देवेंद्र भाऊ हा देवी देवतांचा सन्मान आहे का?” केतकी चितेळ्याच्या पोस्टवरून सुषमा अंधारेंचा सवाल
- “राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या नेत्यांना औरंगजेब चावला का?” भाजपचा खोचक सवाल
- पिंपरी चिंचवडचा बाहुबली हरपला, भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन
- “यापुढे महाराष्ट्रात येताना बाळासाहेब ठाकरे हे नाव पाठ करून या”; सेनेचा नड्डांवर निशाणा
- “महाराज धर्मवीर असते तर काही लोकांनी कटकारस्थान करून औरंगजेबाच्या त्यांना स्वाधीन का केलं”