मुंबई : राज्यात सध्या छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून वाद सुरू झाला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर भाजपकडून सडकून टिका केली जात आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड देखील अडचणीत सापडले आहेत. यावरून आता भाजपने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं आहे.
“देवेंद्र भाऊ हा देवी देवतांचा सन्मान आहे का?” केतकी चितेळ्याच्या पोस्टवरून सुषमा अंधारेंचा सवाल
भाजपचे आमदार राम कदम यांनी असं म्हटलं आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांना कैद करणारा आणि 46 लाख हिंदूची कत्तल करणारा औरंगजेब आहे. काशी, मथूरासहित सोमनाथ आणि लाखो मंदिरे औरंगजेबने उद्धवस्त केली आहे. तसेच स्वत:च्या वडिलांनाही त्यांनी कैद केलं. तसेच स्वत:च्या निर्दयतेने क्रुर हत्या केली आहे.
“राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या नेत्यांना औरंगजेब चावला का?” भाजपचा खोचक सवाल
हिंदुंवर जिजिया जुलमी कर लावला. गुरू तेग बहादुर आणि छत्रपती संभाजी राज्यांची अत्यंत क्रुर शिरच्छेद करत हत्या केली. औरंगजेब राष्ट्रवादीच्या मते क्रुर नसून महान योद्धा आहे. उद्धव ठाकरे तुम्हांला हे मान्य आहे का? आदित्य ठाकरे आपणही गप्प. शिल्लेक राहिलेला बाळासाहेबाचा कडवट कार्यकर्ता हे कधीच मान्य करणार नाही. असं म्हणत राम कदम यांनी निशाणा साधला.
पिंपरी चिंचवडचा बाहुबली हरपला, भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन
दरम्यान, राज्यातील सत्ता हातून निसल्यामुळे हे लोक बावचाळलेले आहेत. संभाजी महाराज यांचा अवमान करून पोट भरलं नाही. तर आता त्या औरंग्याचं गुणगान गाताहेत. जितेंद्र आव्हाड यांना कसला एवढा त्या औरंग्याच्या पुळका आला आहे. तात्काळ माफी मागा नाहीतर उभा महाराष्ट्र तुमच्या सारख्या औरंग्याच्या अवलादीला गाडल्याशिवाय राहणार नाही. असा थेट इशारा चित्रा वाघ यांनी दिला आहे.
#छत्रपती #शिवाजीमहाराजांना कैद करणारा.. 46 लाख हिंदुची कत्तल करणारा.. #काशी #मथुरा सहित #सोमनाथ आणी लाखो मंदिरे उद्वस्त करणारा.
स्वतःच्या वडिलांनाही कैद करणारा.. स्वतःच्या भावाची निर्दयतेने क्रूर हत्या करणारा..
हिंदूंवर जिजिया जुलमी कर लावणारा.
गुरु तेग बहादूर आणी छत्रपती— Ram Kadam (@ramkadam) January 3, 2023
Read also
- “नाहीतर उभा महाराष्ट्र तुमच्या सारख्या औरंग्याच्या अवलादीला गाडल्याशिवाय राहणार नाही”
- “कंगणा, केतकी, अन् अमृता फडणवीसांचा फोटो ट्विट करत अंधारेंचा चित्रा वाघ यांच्यावर निशाणा”
- आधी लढाई पक्षासाठी नंतर आजारपणाशी दोन हात…! जेव्हा लक्ष्मण जगताप रूग्णवाहिकेतून विधानसभेत दाखल झाले..
- उर्फी जावेद चित्रा वाघ यांना नडली..! “आता सगळ्यांना एकत्र या म्हणत चित्रा वाघ यांचं आवाहन”
- 2024 च्या लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल, यंदा तब्बल 6 राज्यात विधानसभेच्या निवडणुका