मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येत्या 5 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येत आहेत. अलिकडेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी चंद्रपुर आणि औरंगाबाद येथे जाहीर सभा घेतल्या होत्या. त्यानंतरच लगचेच योगी आदित्यनाथ यांचा मुंबई दौरा असल्याने चर्चांना उधान आलं आहे.
“नाहीतर उभा महाराष्ट्र तुमच्या सारख्या औरंग्याच्या अवलादीला गाडल्याशिवाय राहणार नाही”
भाजपने देशात मिशन 144 च्या तयारीला जे.पी. नड्डा यांच्या सभेने सुरूवात केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीआधी भाजपने रणशिंग फुंकले आहे. त्यातच 5 जानेवारीला योगी आदित्यनाथ मुंबईला येत आहेत. यावेळी ते मुंबईदौऱ्याच्या वेळी उद्योगपती आणि बॉलिवुडमधील दिग्गजांची भेट घेणार आहेत.
“कंगणा, केतकी, अन् अमृता फडणवीसांचा फोटो ट्विट करत अंधारेंचा चित्रा वाघ यांच्यावर निशाणा”
मुंबईतील प्रसिद्ध मंदिर सिद्धीविनायक आणि महालक्ष्मीचे दर्शन देखील योगी आदित्यनाथ घेणार आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दौऱ्याकडे सध्या सगळ्यांचं लक्ष्य लागून राहिलं आहे.
Read also
- “भिडे वाडा मोठे स्मारक व्हावा ही भूमिका, मोदींकडूनंही त्याला दुजोरा” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- “तर त्याला नंगट मानसिकता म्हणू नये का ?” ऊर्फी जावेदवरून चित्रा वाघांची प्रश्नांची सरबत्ती, काय काय म्हणाल्या..?
- आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
- “नारायण राणेंनी स्वत:च्या भावाचा खून केला, त्याची नार्कोटेस्ट करा, सगळं उघड होईल”
- तुम्ही यावर गप्प का ? शिल्लेक राहिलेला बाळासाहेबाचा कडवट कार्यकर्ता हे कधीच मान्य करणार नाही