मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्यातील राजकीय वातावरण वादग्रस्त वक्तव्यामुळे गाजत आहे. यातच नरेंद्र मोदी यांच्या जी 20 ची तुलना ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानासोबत केल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका केली जात आहे. आज विश्व मराठी संमेलनांचं मुंबईत आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते.
“जिथे शिंदे गटाचा उमेदवार असेल तिथे अधिक ताकद लावू”; भाजपचा आघाडीला सुचक इशारा
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका केली आहे. नरेंद्र मोदींजींच्या जी 20 ची तुलना ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानासोबत करणे हा माऊलींचा अपमान नव्हे का? देवेंद्रजी उत्तर द्या आणि अध्यात्मिक आघाडीच्या माकडांनी यावर बोलायचे धाडस दाखवा. असं म्हणत मिटकरी यांनी भाजपला डिवचलं आहे.
“देशात बेरोजगारीचा उच्चांक दर, मोदी सरकार सामाजिक तेढ वाढवण्यात व्यस्त”
आगामी काळातील जी 20 परिषदेचं यजमान पद यावेळी भारताकडे देण्यात आलं आहे. त्या अध्यक्षपदाची थीम देखील तिच आहे. आपण वैश्विक कुटूंब असून आपलं भविष्य एक आहे. अशा प्रकारे जी 20 सांगत आहे. ते 750 वर्षापुर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला सांगितलं होतं. असं फडणवीस म्हणाले. जी 20 परिषदेच्यानिमित्ताने अनेक बैठका सध्या राज्याच्या विविध शहरात होत आहेत. यातच 15 जानेवारीला जी 20 गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यात होत आहेत. यातच फडणवीसांनी यावर वक्तव्य केल्याने त्यांच्यावर आता टिका केली जात आहे.
“अजितदादांचा संघ-भाजपला एवढा राग का येतो?”
दरम्यान, पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, आपल्या मातृभाषेची जाण ओळखण्याचं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मोदींच्या लक्षात आलं की, भारतीय भाषा जगवायच्या असतील तर त्यांना ज्ञान भाषा कराव्या लागतील. जोपर्यंत आपलं शिक्षण मातृभाषेत होत नाही. तोपर्यंत आपल्या भाषा ह्या वैश्विक होणार नाही. त्यामुळेच नव्याने आलेल्या नवीन शैक्षिणक धोरणार यात बदल करण्यात आला.
नरेंद्र मोदीजींच्या जी 20 ची तुलना ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानासोबत करणे हा माऊलींचा अपमान नव्हे का? देवेंद्रजी उत्तर द्या. आणि अध्यात्मिक आघाडीच्या माकडांनी यावर बोलायचे धाडस दाखवा.#विश्व मराठी संमेलन
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) January 4, 2023
Read also
- “तर दिपक केसरकरांनी 2024 मध्ये तुरूंगात जाण्याची तयारी ठेवावी”
- “2024 ला 200 पेक्षा जास्त विधानसभेच्या जागा निवडून येतील”, चंद्रशेखर बावनकुळे
- “धनंजय मुंडे यांच्या गाडीचा अपघात, पुढील उपचारासाठी मुंबईत हलवणार “
- “मंत्रिमंडळाचा विस्तार होणे अशक्य, हे सरकार पडणार म्हणजे पडणारच”
- “एक थाली के चट्टे बट्टे, खोके अन् दलबदलू मंडळींची राजधानी, सिल्लोड”, सेनेने डिवचलं