मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्री दिपक केसरकर यांनी संजय राऊतांना तुरूंगात टाकण्याची भाषा केली आहे. आगामी काही काळात संजय राऊतांनी तुरूंगात पुन्हा जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा केसरकर यांनी राऊतांना दिला आहे. त्यावर मला फाशी द्या मला गोळ्या घाला, मी पुन्हा म्हणतो मै झुकेगा नहीं साला असं म्हणत राऊतांनी आवाहन दिलं आहे.
“मंत्रिमंडळाचा विस्तार होणे अशक्य, हे सरकार पडणार म्हणजे पडणारच”
शिंदे गॅंगकडून दिपक केसरकर मला तुरूंगात टाकण्याची धमकी देत आहे. मला आशा आहे की, केंद्रीय मंत्री अमित शहा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा निर्लज्ज धमक्या पाहत आहात. त्यांना असे वाटते की कायदा त्याच्या नॉटी गर्ल्सप्रमाणे नाचू शकतो. मला अटक करा, मला फाशी द्या. नाहीतर गोळ्या घाला, मी पुन्हा म्हणतो मै झुकेगा नहीं साला. असं म्हणत राऊतांनी उलट सरकारलाच आवाहन दिलं आहे.
“एक थाली के चट्टे बट्टे, खोके अन् दलबदलू मंडळींची राजधानी, सिल्लोड”, सेनेने डिवचलं
दरम्यान, आम्ही आमच्या पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी तुरूंगात जायला तयार आहोत. आम्ही तुमच्यासारखे पळपुटे नाहीत. आम्ही तुमच्यासारखे लफंगे नाहीत. तुम्ही म्हणजे न्यायालय नाही. तुम्ही म्हणजे कायदा नाही. दिपक केसरकर मला तुरूंगात पाठवण्याची भाषा करत असतील तर 2024 साली त्यांनीही तुरूंगात जाण्याची तयारी ठेवावी. सर्व तयारी केली असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Deepak Kesarkar frm Shinde Gang is threatening to put me bhind bars.I hope @AmitShah & @Dev_Fadnavis r watching these brazen threats!
Does he think tht Law can Dance like a nautch girl to his tunes?
Mr Kesarkar,
Arrest me,hang me or Shoot me, I repeat,Main jhukega nahi Sala!— Sanjay Raut (@rautsanjay61) January 4, 2023
Read also
- “माझ्या विधानावर ठाम, अगोदर बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना विचारा”; अजित पवार
- “फडणवीसांकडून जी 20 ची तुलना ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानासोबत”; राज्यात आणखी एक नवा वाद
- “तर दिपक केसरकरांनी 2024 मध्ये तुरूंगात जाण्याची तयारी ठेवावी”
- “2024 ला 200 पेक्षा जास्त विधानसभेच्या जागा निवडून येतील”, चंद्रशेखर बावनकुळे
- “धनंजय मुंडे यांच्या गाडीचा अपघात, पुढील उपचारासाठी मुंबईत हलवणार “